Sanjay Raut : आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी, तर कुणाला २ एकर जमिनी वाटल्या; संजय राऊतांचा आरोप

Maharashtra Political News : फुटीर आमदारांना काल शेअर मार्केटसारखा भाव होता. काहींना २५ कोटी रुपये वाटले. तर काही आमदारांना प्रत्येकी २ एकर जमिनी देखील वाटल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी वाटले, तर कुणाला २ एकर जमीन; संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut NewsSaam Tv
Published On

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत अखेर महायुतीने बाजी मारली. महाविकास आघाडीतील आमदारांच्या फाटाफूटीमुळे महायुतीचे सर्वच ९ उमेदवार विजयी झाले. परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने समर्थन दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, आमदारांची फाटाफूट आणि घोडेबाजारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.

आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी वाटले, तर कुणाला २ एकर जमीन; संजय राऊतांचा आरोप
Maharashtra Politics : पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना शोधा अन् थेट घरी पाठवा; काँग्रेस हायकमांडचे नाना पटोलेंना आदेश

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आम्हाला कोणताही पराभवाचा धक्का बसलेला नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही आमदार फुटलेले नाही. काँग्रेसचे ते ७ जण केवळ कागदावर काँग्रेससोबत होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फुटीर आमदारांना काल शेअर मार्केटसारखा भाव होता. काहींना २५ कोटी रुपये वाटले. तर काही आमदारांना प्रत्येकी २ एकर जमिनी देखील वाटल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

"शिवसेनेकडे (ठाकरे गट) केवळ १५ मतं असतानाही आमचे उमेदवार मिलिंद नार्वेकर निवडून आले. शेकापचे जयंत पाटील सुद्धा निवडून आले असते, पण गणित जुळलं नाही. आम्ही सर्वांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण जयंत पाटलांकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. शरद पवार यांनीही जयंत पाटलांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. ते आमच्या महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग आहेत", असं राऊत म्हणाले.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात विनायक राऊत यांनी कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "निवडणुकीवेळी पैशांचं वाटप झालं, काही लाख मते विकत घेण्यात आली, याबाबतचे सगळे पुरावे आमच्या हातात आहेत. म्हणूनच विनायक राऊत यांनी कोर्टात धाव घेतल्याचं संजय राऊत म्हणाले.

आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी वाटले, तर कुणाला २ एकर जमीन; संजय राऊतांचा आरोप
Maratha Reservation : सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर अख्खी मुंबई जाम करू, लक्ष्मण हाके यांचा थेट इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com