Maratha Reservation : सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर अख्खी मुंबई जाम करू, लक्ष्मण हाके यांचा थेट इशारा

Laxman Hake vs Manoj Jarange Patil : सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले, तर मुंबई जाम करू, असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Laxman Hake vs Manoj Jarange Patil
Laxman Hake vs Manoj Jarange PatilSaam TV
Published On

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. आज हा अल्टिमेटम संपत असून मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली काढणार आहेत. यावेळी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिला आहे.

Laxman Hake vs Manoj Jarange Patil
Maharashtra Politics : पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना शोधा अन् थेट घरी पाठवा; काँग्रेस हायकमांडचे नाना पटोलेंना आदेश

सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले, तर मुंबई जाम करू, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यातल्या १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत आहात.आम्ही ६० टक्के ओबीसीने तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका, अशी विनंती देखील हाके यांनी केली आहे.

इतकंच नाही, तर तुम्ही सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर आम्ही राज्यातील सर्व ओबीसी बांधव मुंबईत येऊन चक्काजाम आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे एकाबाजूला मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना दिलेला शब्द आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा इशारा यामुळे राज्य सरकार पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोन्ही नेते सांगोला तालुक्यात आले होते. यावेळीओबीसी बांधवानी फटाके फोडत आणि हलग्यांच्या कडकडाटात त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

लक्ष्मण हाके म्हणाले, "बीड येथील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर उभे राहून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या अठरा पगड जातीचे आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या भुजबळ साहेबांवर कोणी अशा प्रकारची शिवराळ भाषा वापरून टीका करत असेल, तर आम्ही महाराष्ट्रातील सगळी माणसे एकत्रित येऊन त्याचा निषेध करू".

मनोज जरांगे पाटील यांना २८८ जागा लढवायच्या असतील तर त्यांनी लढवून बघाव्यात, असे आव्हान देखील हाके यांनी दिलंय. महाराष्ट्राची सुसंस्कृत ओळख पुसायचे काम करणारे अनेक हिटलर होऊन गेले. मात्र इथली जनता सुज्ञ आहे, असं म्हणत हाके यांनी जरागेंवर शा‍ब्दिक हल्ला चढवला.

दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सगेसोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्याचा शब्द दिल्याचं मनोज जरांगे सांगत आहेत. त्यामुळे सगेसोयरेंबाबत मुख्यमंत्र्यांना हा अध्यादेश काढण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार असताना आता ओबीसी समाजाने दिलेल्या हा इशाऱ्यामुळे सरकार मोठा पेच उभा राहणार आहे.

Laxman Hake vs Manoj Jarange Patil
Bhusawal Nandurbar Train : मोठी बातमी! भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तब्बल अर्धा तास दगडफेक; धडकी भरवणारा VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com