शिवसेना मनसेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोणत्या वार्डातून कोणाचा उमेदवार?

Shiv Sena MNS Seat Sharing Formula for Mumbai BMC: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. कोणत्या वॉर्डातून कोणाचा उमेदवार असणार, जाणून घ्या सविस्तर माहिती.
Thackeray brothers Uddhav and Raj Thackeray during a key political meeting ahead of Mumbai civic elections.
Thackeray brothers Uddhav and Raj Thackeray during a key political meeting ahead of Mumbai civic elections.Saam Tv
Published On

वैदेही काणेकर, साम टीव्ही

राज्यातील 29 महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीतील नेत्यांच्या जागावाटपासाठी भेटीगाठी सुरू झाल्या असून, यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने मराठी मतदारांच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान ठाकरे बंधूंमधील महत्त्वाचा जागावाटपाचा फॉर्म्युला साम टीव्हीच्या हाती लागला आहे ज्यात मुंबईतील सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.

दहिसर विधानसभा

मनसेकडून वॉर्ड क्रमांक ८ आणि १० ची मागणी करण्यात आली होती. हे दोन्ही वॉर्ड शिवसेना (ठाकरे गट) मनसेला सोडणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे गटाला दहिसरमध्ये वॉर्ड १, ६ आणि ७ देण्यात आल्याचे समजते. वॉर्ड १ मधून विनोद घोसाळकर, तर वॉर्ड ७ मधून पूजा घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे.

Thackeray brothers Uddhav and Raj Thackeray during a key political meeting ahead of Mumbai civic elections.
Pradnya satav : काँग्रेसला रामराम का केला? भाजपमध्ये प्रवेश करताचा प्रज्ञा सातव म्हणाल्या...

बोरिवली विधानसभा

मनसेने वॉर्ड १४ आणि १८ ची मागणी केली होती. चर्चेनंतर मनसेला वॉर्ड १४ आणि ९ दिले जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाला वॉर्ड १६ आणि १८ हवे असून वॉर्ड १३, १५ आणि १७ बाबत अद्याप निर्णय झालेला नाही.वॉर्ड १८ मधून शिवसेना (UBT) चे पांडुरंग देसाई यांचे नाव चर्चेत आहे.

Thackeray brothers Uddhav and Raj Thackeray during a key political meeting ahead of Mumbai civic elections.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

मागठाणे विधानसभा

मनसेची ताकद लक्षात घेता त्यांनी वॉर्ड १४, ४, ५, १२ आणि २६ ची मागणी केली होती.

त्यापैकी मनसेसाठी वॉर्ड ३ आणि ११ सोडण्यात आल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून वॉर्ड २५, ५, ४ आणि १२ बाबत विचार सुरू आहे.

वॉर्ड ५ मधून उदेश पाटेकर,

वॉर्ड ४ मधून राजू मौला,

तर वॉर्ड १२ मधून शशिकांत झोरे यांच्या नावांची चर्चा आहे.

मात्र, वॉर्ड ५ वरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप रस्सीखेच सुरू आहे.

कांदिवली पूर्व विधानसभा

मनसेने वॉर्ड २३, २६ आणि ३६ ची मागणी केली होती. त्यापैकी वॉर्ड २३ मनसेला देण्यात आल्याचे समजते.

उद्धव ठाकरे गटाने वॉर्ड २६, २८, २९ आणि ४४ मागितले आहेत.

वॉर्ड २४, २७ आणि ४५ बाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

चारकोप विधानसभा

मनसेने वॉर्ड २०, २१, २२ आणि ३१ ची मागणी केली होती.

त्यापैकी वॉर्ड २१, २२ आणि ३१ मनसेसाठी सोडण्यात आल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे गटाला वॉर्ड १९ आणि २० अपेक्षित आहेत.

वॉर्ड ३० अद्याप बॅलन्समध्ये आहे.

मालाड पश्चिम विधानसभा

मनसेने वॉर्ड ४६ ची मागणी केली होती आणि तो वॉर्ड मनसेला देण्यात आल्याचे समजते.

उद्धव ठाकरे गटाला वॉर्ड ३२, ३३, ४७, ४८ आणि ४९ दिले जाण्याची शक्यता आहे.

वॉर्ड ३४ आणि ३५ बाबत अजूनही चर्चा सुरू आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून, उर्वरित वॉर्डवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com