मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरू महायुतीत संघर्ष पेटण्याची चिन्ह् आहेत. कारण शिंदेसेनेनं अचानक महापौरपदाच्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळावर दावा ठोकल्याची चर्चा आहे. आणि त्यासाठीच शिंदेसेनेच्या 'ऑपरेशन टायगर' राबवण्याच्या हालचारी सुरू आहेत..महापौरपदावर दावा करण्यासाठी नगरसेवकांची संख्या वाढवण्याची शिंदेसेनेची तयारी सुरू आहे. यासाठी शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेसेनेकडे आपला मोर्चा वळवल्याची जोरदार चर्चा रंगलीय. ठाकरेसेनेचे नगरसेवक गळाला लावण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. शिंदेसेनेकडून मुंबईच्या महापौरपदासाठी कशी रणनीती आखली जातेय पाहुयात
- महापौरपदासाठी शिंदेसेनेचं ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
- श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, निलेश राणेंसह योगेश कदम यांच्यावर जबाबदारी
- ठाकरेसेनेतील नगरसेवकांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू
- सव्वा वर्षानंतर महापौरपद मिळवण्यासाठी संख्याबळ वाढवण्याची रणनीती
- भाजपचे 88, शिंदेसेनेचे 29 तर ठाकरेसेनेचे 64 नगरसेवक आहेत... त्यामुळे संख्याबळ वाढवून भाजपवर महापौरपदासाठी दबाब टाकण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय...
शिंदेंच्या ऑपरेशनला मुहूर्त नसतो, असं म्हणत शिंदेसेनेनं ठाकरेसेनेला डिवचलयं.. तर फोडाफोडी केल्याशिवाय शिंदेंचं मन थाऱ्यावर राहत नाही, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय...आता शिंदेसेनेकडून महापौरपदासाठी ऑपरेशन टायगरची तयारी सुरु असताना दुसरीकडे भाजपमध्ये अस्वस्थता पसरलीय...त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना महापौर रितू तावडेंनी सावध पवित्रा घेतलाय...
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक संख्याबळ गाठत भाजपनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेचं महापौरपद मिळवलं. आता याच महापौरपदावरून महायुतीत संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. मात्र त्यापूर्वी आपली ताकद वाढवण्याचं आव्हान शिंदेसमोर असणार आहे. शिंदेंच्या गळाला ठाकरेंचे किती नगरसेवक लागतात त्यावर पुढची सगळी समीकऱणं अवलंबून आहेत. त्यामुळे तिसरं ऑपरेशन टायगर होणार का? याबाबत उत्सुकता वाढलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.