Sharad Pawar : निवडणुकीत पावसाची कमतरता, पण मतांची कमतरता पडू दिली नाही : शरद पवार

Sharad Pawar News : राज्यात उन्हाळ्यात उन्हाने शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय स्थिती झाली आहे. यामुळे शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट दिली.
निवडणुकीत पावसाची कमतरता, पण मतांची कमतरता पडू दिली नाही : शरद पवार
National Congress Party 25 Anniversary: Saamtv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : शरद पवार बुधवारी पुरंदर तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पुरंदर तालुक्याच्या काही गावांमधील शेतकऱ्यांकडून दुष्काळग्रस्त शेतीची माहिती घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची परिस्थिती शरद पवार सांगितली. राज्यात वातावरण बदलले आहे, पण समाधानकारक नसल्याचेही पवारांनी सांगितले. तर निवडणुकीत पावसाची कमतरता होती, पण मतांची कमतरता पडू दिली नाही, असं म्हणत शरद पवारांनी शेतकऱ्यांचं कौतुक केलं.

शरद पवार यांनी पुरंदार तालुक्यातील गावांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. भेटीनंतर शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यातील काही भागात वेगळे चित्र दिसत होते. राज्य सरकारने काही गाव दुष्काळग्रस्त जाहीर असून पुरंदर तालुका अग्रभागी होता. सध्या या भागात तातडीने उपाय योजना करायची, काय योजना हातात घेता येईल, याची माहिती घ्यावी म्हणून आलो आहे. राज्यात वातावरण बदलले आहे. पण समाधानकारक नाही. राज्यातील मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक बैठक घ्यायची आहे'.

निवडणुकीत पावसाची कमतरता, पण मतांची कमतरता पडू दिली नाही : शरद पवार
Maharashtra Politics: अमोल मिटकरी अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? बजरंग सोनवणेंचा खोचक टोला

'सुप्रिया सुळे या मुलाच्या पदवीदान समारंभाला इंग्लंडला गेल्या आहेत. तुम्ही जे काम करायचं ते केलं. निवडणुकीत पावसाची कमतरता होती. पण तुम्ही मतांची कमतरता पडू दिली नाही,असे शरद पवार म्हणाले. 'राज्य सरकारला दोन-तीन मुद्दे सूचना केल्या आहेत. सूचना लेखी दिल्या आहेत. मी स्वत: येथील आमदारांसोबत एकत्रित बसू. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकरडे बैठक घेऊन काही ना काही आग्रह करायचं की मागे लागायचं, हे आम्ही ठरवू, असे पवार म्हणाले.

निवडणुकीत पावसाची कमतरता, पण मतांची कमतरता पडू दिली नाही : शरद पवार
Maharashtra Politics : अजित पवार यांच्यामुळेच भाजपच्या ब्रँडला धक्का बसला; RSSच्या मुखपत्रातून मोदी-शहांना खडेबोल

'माजी आमदार विजय शिवतारे आणि माजी आमदार टेकवडे यांच्या जमिनी याच भागात असल्याची माहिती गावकऱ्यांनी शरद पवारांना दिली. येथील काही लोकांचा एमआयडीसीला विरोध आहे. त्यांचं नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊन एमआयडीसी बांधून अधिक हाताला काम देऊ. पुणे शिक्षणाचं माहेरघर होतं. पण पुणे आता औद्योगिक नगरी झाली. पुण्यात आता कारखाने द्यायचे नाहीत. लोकांच्या हाताला काम द्यायचे असेल तर एमआयडीसीशिवाय पर्याय नाही. पण लोक होकार देतील, तेव्हा करू नाही तर हट्ट नको, असेही पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com