Pune Rain: पुण्यात पावसाचं थैमान, लक्ष द्या; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

Supriya Sule On Pune Rain: नाले सफाई करण्यासाठी काढण्यात आलेले कंत्राट, ज्या ठेकेदारांना मिळतात, त्यांना ब्लॅकलिस्ट का केले जात नाही? पुण्यात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
पुण्यात पावसाचं थैमान, लक्ष द्या; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र
Supriya Sule On Pune RainSaam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुण्यात १० दिवसात प्रचंड ठिकाणी पाणी साठले आहे. सातत्याने हे का घडत आहे? याची आम्ही पाहणी केली. नाले भरून गेले आहेत, त्यामुळे पाणी जायला जागा नाह. घाई घाईने केलेल्या कामात चुका झाल्या आहेत. आम्ही टॅक्स भरतो पण ते पैसे जातात कुठे? नाले सफाई का नाही झाली?, असा प्रश्न शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारला विचारला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, ''नाले सफाई करण्यासाठी काढण्यात आलेले कंत्राट, ज्या ठेकेदारांना मिळतात, त्यांना ब्लॅकलिस्ट का केले जात नाही? गडकरी साहेबांचे अभिनंदन करते. कारण असं काही झालं तर तिथले ठेकेदार ब्लॅकलिस्ट होतात.

पुण्यात पावसाचं थैमान, लक्ष द्या; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र
CM Shinde: कापूस, सोयाबीन आणि कांद्याने आम्हाला रडवलं; लोकसभेत मोठा फटका बसला: मुख्यमंत्री

'पुण्याकडे लक्ष द्या, मुख्यमंत्री यांना पत्र लिहणार'

त्या म्हणाल्या की, ''ड्रग्स पुण्यात, पळून जाणारे पुण्यातलं, ससून मध्ये रक्त बदलले जाते, पाणी तुंबण्याचे काम पुण्यात होतं. ही महाराष्ट्र सरकार आणि पुणे महापालिकाची नैतिक जबाबदारी आहे. पुण्याकडे लक्ष द्या, मुख्यमंत्री यांना पत्र लिहणार. ८ ते १० दिवसात असाच कारभार राहिला तर आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू.

विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र पवार यांना तिकीट द्या, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याचबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''मला माहिती नाही, कारण आज मी पुणे दौऱ्यावर आहेत.''

पुण्यात पावसाचं थैमान, लक्ष द्या; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र
Pune Viral Hording: पुणे म्हणजे 'विषय हार्ड'! हेल्मेट घालण्यासाठी अनोखी जनजागृती, थेट बाहुबलीला उतरवलं मैदानात; पाहा फोटो

अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली जात आहे. यावर त्या म्हणाल्या की, ''सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com