Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

Sharad Pawar Hospitalised: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या भेटीसाठी अनेक दिग्गज नेते रुग्णालयात आले आहेत.
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
Sharad Pawar Health UpdateSaam Tv
Published On: 
  • शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर

  • सुनेत्रा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन घेतली शरद पवारांची भेट

  • प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी देखील घेतली शरद पवारांची भेट

  • शरद पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात नेत्यांची गर्दी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वेगवेगळ्या पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी रुग्णालयात येत शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर अनेक नेत्यांनी फोन करून त्यांच्या प्रकृची विचारपूस केली. शरद पवार यांचा रुग्णालयातील व्हिडीओ देखील समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे. शरद पवार रुग्णालयात दाखल असल्याचे कळताच अनेक नेत्यांनी भेटीसाठी रुग्णालयात गर्दी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी गुरूवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना १० नोव्हेंबरपर्यंत आपण एकत्र बसू असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा बोलतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. उद्योगपती गौतम अदानी, शिवसेना नेते अनिल देसाई आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील आज शरद पवार यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील थोड्यावेळापूर्वी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. संजय राऊत यांनी त्यांचे नुकताच प्रकाशित झालेले पुस्तक दिले. या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
Sharad Pawar: पवारांचं टायमिंग कुणालाच कळत नाही; शरद पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया व्हायरल

त्याचसोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. ४ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारणा केली होती. 'तुम्ही इतकी वर्षे देशाला मार्गदर्शन केले. आता सुप्रिया सुळे आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या आणि आशीर्वाद द्या.', असे पीएम मोदी यांनी शरद पवारांना सांगितले होते.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
Sharad Pawar: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

दरम्यान, १ नोव्हेंबरला शरद पवार सोलापूरच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ पुण्याला आणण्यात आले आणि २ नोब्हेंबरला त्यांना पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या शरद पवार यांची प्रकृती ठिक असून त्यांना आज रात्री किंवा उद्या सकाळी डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
Sharad Pawar : प्रफुल पटेलांनी रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.