Sharad Pawar: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

Sharad Pawar Admitted Hospital : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल करत असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या काही वैद्यकीय चाचण्या होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांनी ही माहिती सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली. आम्ही बाबांना पुढील चाचण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. तुमच्या सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट सुळेंनी केलीय.

आज सकाळीच शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं आहे. पुढील एक-दोन दिवसांत ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्या विविध आरोग्य चाचण्या पूर्ण केल्या जातील. तपासण्यांचे सर्व अहवाल आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी काळजी करू नये तसेच रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.