CET Exam News: सारथी, महाज्योती, बार्टी प्रवेश परीक्षा स्थगित; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योती, सीईटी परीक्षेचा पुन्हा पेपर फुटल्याचा प्रकार घडला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकत मोठा गोंधळ केला. यानंतर विद्यापीठाने या परीक्षा स्थगित केल्या.
CET Exam Postponed
CET Exam PostponedSaam Tv
Published On

>> सचिन जाधव

CET Exam Postponed :

एक मोठी बातमी समोर आली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, सीईटी (CET Exam) परीक्षेचा पुन्हा पेपर फुटल्याचा प्रकार घडला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकत मोठा गोंधळ केला होता. यानंतर पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेत या परीक्षा स्थगित केल्या आहेत.

बुधवारी (१० जानेवारी रोजी) परीक्षेत प्रश्नसंच सी आणि डी सीलबंद नसल्याने परीक्षेत गैरकारभार झाल्याने परीक्षेला स्थगिती दिली, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करत सांगण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CET Exam Postponed
Delhi Earthquake: दिल्ली-NCR सह अख्खा उत्तर भारत भूकंपानं थरथरला; भूकंपाचा केंद्रबिंदू मात्र दुसऱ्या देशात!

विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेय परिपत्रकात सांगण्यात आलं आहे की, ''सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. फेलोशिपच्या संयुक्त चाळणी परीक्षेचे आयोजन बुधवार, दिनांक १० जानेवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० ते १५.०० या वेळेत पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील परीक्षा केंद्रांमार्फत आयोजित करण्यात आले होते. परीक्षेसाठी ए, बी, सी व डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती.'' (Latest Marathi News)

यात सांगण्यात आलं आहे की, ''प्रश्नपत्रिका संचांची छपाई दोन वेगवेगळ्या मुद्रणालयांकडून गोपनीयरीत्या करुन घेण्यात आली होती, त्यामुळे छपाई करण्याच्या स्वरुपामध्ये बदल असू शकतो. प्रश्नपत्रिका संचांची अत्यंत गोपनीय पध्दतीने आणि विहित सुरक्षा मानकांचे पालन करुन छपाई करण्यात आली होती आणि ती संबंधित परीक्षा केंद्रांवर सीलबंद स्वरुपात पोहचविण्यात आली होती. प्रश्नपत्रिका संच सी आणि डी मधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचनेमधील सूचना क्र.३(i) मध्ये प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे, सौल नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारु नये, असे नमूद करण्यात आलेले होते.''

CET Exam Postponed
MLA Disqualification Result: अजिबात धाकधूक नाही, मात्र 'त्या' भेटीनं संशय वाढला; NCP च्या सुनावणीवर जयंत पाटील काय म्हणाले?

यात पुढे म्हटलं आहे की, ''ए आणि बी प्रश्नपत्रिका संचास सील होते, परंतु सी आणि डी प्रश्नपत्रिका संच वेगळ्या मुद्रणालयाकडून छपाई करुन घेतले असल्याने त्यांना सील नव्हते. सीलबंद प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे काही परीक्षार्थी हे परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांच्या बाबतीत परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. सी आणि डी संचामधील प्रत्येक प्रश्नपत्रिका संचास सील नसले तरी प्रश्नपत्रिका संच असलेल्या पाकिटांना सील करण्यात आले होते, सदर पाकिटांचे सील परीक्षा केंद्रांवरच उघडण्यात आले होते.''

असं असलं तरी विद्यापीठाने आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, ''परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांची प्रत कोणत्याही व्यक्तिकडे कोणत्याही स्वरुपात (Hard Copy किया Soft Copy) उपलब्ध नव्हती किवा त्या प्रश्नपत्रिकांमधील मजकूरदेखील कोणत्याही व्यक्तिला कळालेला नव्हता. संपूर्ण परीक्षा प्रक्रियादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत परीक्षार्थीनी दिलेल्या निवेदनाचा विचार करता, विद्यापीठाने परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com