Sanjay Raut On Sanjay Rathod: 'माणुसकी जिवंत असेल संजय राठोडांचा राजीनामा घ्या'; संजय राऊतांचे फडणवीसांना आव्हान!

Latest Political News: भ्रष्टाचाराच्या या प्रकारावरुन आता मंत्री संजय राठोडआणि सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
Sanjay Raut And Sanjay Rathod
Sanjay Raut And Sanjay RathodSaam Tv
Published On

Mumbai News: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे. आता या भ्रष्टाचाराच्या प्रकारावरुन मंत्री संजय राठोडआणि सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

Sanjay Raut And Sanjay Rathod
Sanjay Rathod News: मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार? थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र धाडून केली तक्रार

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी याच प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधलाय आणि त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'माणुसकी जिवंत असेल संजय राठोडांचा राजीनामा घ्या', असे आव्हान संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे सांगितले की,' देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना सातत्याने अशा विषयांवर राजीनामा मागत होते. देवेंद्र फडणवीस यांनी आता दोन राजीनामे मागायला पाहिजे. त्यांच्यातली माणुसकी आणि आत्मा जिवंत असेल तर त्यांनी ज्या मंत्र्यांचा उल्लेख केला त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे.' असे आव्हान त्यांनी केले.

Sanjay Raut And Sanjay Rathod
Sanjay Raut on Ajit Pawar: 'शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली केली', संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

त्याचसोबत, 'आज फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. म्हणून त्यांच्या जबाबदारी संपत नाही तर उलट वाढतात. म्हणून माझं त्यांना आवाहन आहे की, मंत्री संजय राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्याच अधिकाऱ्याने समोर आणला आहे. हा अन्न औषध प्रशासना संदर्भातला भ्रष्टाचार आहे. म्हणजे त्यांनी किती मोठा घोटाळा केला असेल. अन्न व औषध प्रशासन हे साधं खात नाही. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे.' असे संजय राऊत म्हणाले.

तसंच, 'आपण सरकार मधले जरी असलो तरी या महाराष्ट्राचे देणे लागतो. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांचा राजीनामा मागायला पाहिजे.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. दरम्यान, मंत्री संजय राठोड हे याआधी देखील अडचणीत आले होते. ठाकरे सरकारच्या काळात संजय राठोड यांना एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Sanjay Raut And Sanjay Rathod
India Coronavirus Update: भय इथले संपत नाही! देशात 24 तासांत 10,542 कोरोना रुग्णांची नोंद, 38 जणांचा मृत्यू

दरम्यान, मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. तक्रारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन उभं करून बंद पुकारणाऱ्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. या पत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री व यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप या असोसिएशनने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com