Sanjay Raut on Ajit Pawar: 'शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली केली', संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

Mahavikas Aghadi News: "आमचं वकील पत्र कुणी घेण्याचं कारण नाही", अजित पवारांचा वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut on Ajit Pawar
Sanjay Raut on Ajit PawarSaam Tv
Published On

Sanjay Raut Latest Press Conference : राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात मतभेद वाढलेत का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच कारणही तसेच आहे.

अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरु होती. यावरच मंगळवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राऊतांना टोला लगावत आमची वकिली करण्याची गरज नाही, असं म्हटलं होत. यावर आता संजय राऊत यांनीही उत्तर दिलं आहे.

'...तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होता'

संजय राऊत म्हणाले की, मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. माझ्यावर खापर का फोडताय आणि फोडण्याचा कारण काय? शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होता. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Ajit Pawar
Sanjay Rathod News: मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार? थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र धाडून केली तक्रार

संजय राऊत पुढे म्हणाले की, ''हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की. आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत राहावा आणि त्याचे लचकेतुटले जाऊ नये. ही जर आमची भूमिका असेल आणि जर त्यासाठी कोणी आमच्यावर खापर फोडत असेल, तर जरा गंमत आहे.''

तत्पूर्वी संजय राऊत म्हणाले की, ''मी नेहमी म्हणतो, काँग्रेस असो राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल, हे पक्ष जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून तोडण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो'' (Maharashtra Latest News)

Sanjay Raut on Ajit Pawar
India Coronavirus Update: भय इथले संपत नाही! देशात 24 तासांत 10,542 कोरोना रुग्णांची नोंद, 38 जणांचा मृत्यू

Ajit Pawar on Sanjay Raut : अजित पवार काय म्हणाले होते?

राऊत यांना टोला लगावत अजित पवार म्हणाले होते की, ''आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. मी माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय.''

''त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊतांबद्दल संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com