Patra Chawl Scam: संजय राऊत दिलासा; पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब

Sanjay Raut News: कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी राऊत यांच्यावर आरोप निश्चित होणार
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv
Published On

सचिन गाड

Political News: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप असलेले खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या जमीनला ईडीने विरोध केला होता. त्यानंतर आज (10 मे) खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात पोहोचले होते. कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी राऊत यांच्यावर आरोप निश्चित होणार होते. मात्र, संजय राऊतांना आता दिलासा मिळाला आहे.(Latest Marathi News)

पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत मुंबई सत्र न्यायालयात पोहोचले होते. मात्र आरोपी सारंग आणि राकेश वाधवान आजही कोर्टात गैरहजर होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Sanjay Raut
Malegaon News : मालेगावातील पाणीपूरवठ्याबाबत महापालिकेचा महत्त्वपूर्ण बदल; जाणून घ्या कारण

गुरू आशिष कंपनी ही दिवाळखोर घोषित झाल्यानं प्रकरण एनसीएलटी प्रलंबित असल्याचं आज कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे गुरू आशिषला आरोपी बनवण्यात आल्यानं त्यांची जबाबदारी कोण घेणार? हे अद्याप स्पष्ट नाही.

पुढील सुनावणीत सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान संजय राऊतांनी आपला राजस्व पासपोर्ट नूतनीकरणासाठी परत करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज सादर केला आहे. ईडीचा राऊतांच्या अर्जाला विरोध नाही त्यामुळे मुंबई सत्र न्यायालय राऊतांच्या अर्जावर उद्या (११ मे) निर्णय देणार आहे.

संजय राऊत तब्बल 104 दिवस कारागृहात

या प्रकरणी ऑगस्ट महिन्यात अटक झाल्यानंतर संजय राऊत तब्बल 104 दिवस कारागृहात होते. राऊतांना जमीन मंजूर करताना कोर्टानं, तपास यंत्रणा ईडीवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 1034 कोटींचा कथित पत्राचाळ घोटाळा कलीचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यासह प्रवीण राऊत, राकेश आणी सारंग वाधवान आरोपी आहेत. (Political News)

Sanjay Raut
Cyclone Mocha: चक्रीवादळ 'मोचा'चे तीव्र वादळात रूपांतर; अंदमानमध्ये ऑरेंज अलर्ट, समुद्रकिनारी मुसळधार पावसाचा इशारा

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com