Malegaon News : मालेगावातील पाणीपूरवठ्याबाबत महापालिकेचा महत्त्वपूर्ण बदल; जाणून घ्या कारण

नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Malegaon, Water Supply
Malegaon, Water Supplysaam tv

Malegoan News : वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक कामासाठी शनिवारी (ता. 13 मे) गिरणा धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. यामुळे शनिवारी मालेगाव शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra News)

Malegaon, Water Supply
Maratha Kranti Morcha चा राज्य सरकारला अल्टीमेटम; पालकमंत्र्याच्या घरासमोर छेडणार गोंधळ घालो आंदोलन

दरम्यान शनिवारनंतर नेहमीप्रमाणे एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील, अशी माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलीय. वीज वितरण कंपनीच्या सायने सबस्टेशनवरील एक्सप्रेस फीडरवरील तांत्रिक कामे करण्यासाठी वीजपुरवठा खंडित होणार आहे. या काळात गिरणा पंपिंग स्टेशनला मोठ्या कालावधीसाठी विद्युत पुरवठा केला जाणार नाही.

Malegaon, Water Supply
Brij Bhushan Sharan Singh यांना अटक करा; दिल्लीतील आंदोलक कुस्तीगिरांना महाराष्ट्रातून पाठिंबा

त्यामुळे गिरणा धरण उद्भव विहिरीचे पाणी पंपिंग ठप्प होणार आहे. त्यामुळे या (शनिवार) दिवशीचा पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारचा नियोजित पाणीपुरवठा रविवारी आणि रविवारचा नियोजित पाणीपुरवठा सोमवारी केला जाणार असून अशा पद्धतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असं आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com