सकाळ करंडक : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तरुणाईचा नाट्याविष्कार, स्पर्धेचे वेळापत्रक वाचा

Sakal Karandak: ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची मुंबई विभागीय अंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात होणार आहे. आठ एकांकिका सादर होणार आहे. तर सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले तरुण कलाकारांशी संवाद साधणार आहेत.
Sakal Karandak:
Sakal Karandak Mumbai inter-collegiate one-act play competition finalssaam tv
Published On: 
Summary
  • सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची मुंबई विभागीय अंतिम फेरी

  • सकाळ करंडक स्पर्धेत मुंबईतील आठ एकांकिका सादर होणार

  • यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे सकाळ करंडक अंतिम फेरी

‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत उद्या (ता. ८) तरुणाई त्यांचे नाट्यविष्कार सादर करणार आहेत. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुविख्यात अभिनेत्री मधुराणी गोखले सायंकाळी ५.३० वाजता संवाद साधणार आहेत. सकाळी ९ वाजतापासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, नाट्यरसिकांना प्रवेश नि:शुल्क आहे.

मुंबई विभागीय अंतिम फेरीत एकूण आठ एकांकिका सादर होणार आहेत. त्यातून सर्वोत्कृष्ट पहिल्या क्रमांकाची एकांकिका पुणे येथे हाणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी निवडली जाईल, असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी त्यांची मुलाखत नाट्यरसिक आणि विद्यार्थी कलावंतांसाठी विशेष आकर्षण असेल. या स्पर्धेचे सहप्रायोजक रिलायन्स डिजिटल आहे.

Sakal Karandak:
Rajpal Yadav : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांसमोर भावूक झाला राजपाल यादव, आता काय म्हणाला?

महाविद्यालयीन रंगभूमी ही मराठी नाट्यविश्वाची खरी प्रयोगशाळा मानली जाते. याच रंगभूमीवरून अनेक कलावंतांनी व्यावसायिक नाट्य, चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात यशस्वी वाटचाल केली आहे. त्या परंपरेला नवी ऊर्जा देण्याचे काम गेल्या काही वर्षांत ‘सकाळ करंडक’ सातत्याने करत आहे. केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर नव्या पिढीतील कलागुणांना दिशा देणारे, सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि दर्जेदार एकांकिकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून या स्पर्धेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sakal Karandak:
Actress Pregnant : ३५ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार प्रसिद्ध अभिनेत्री, क्यूट फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

मुंबईत सादर होणाऱ्या एकांकिका

वेळ : महाविद्यालय : एकांकिका

सकाळी ९ वा. : सिडेनहॅम महाविद्यालय : यात्रा

सकाळी १० वा. : सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज : खोटं बोल नाऱ्या

सकाळी ११ वा. : आर. ए. पोद्दार कॉलेज : मालिक

सकाळी १२ वा. : डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय : जिलेबी

दुपारी १.३० वा. : चेतना कॉलेज : मॅरेथॉन

दुपारी २.३० वा. : विद्यालंकार कॉलेज : शुभमंगल सावधान

दुपारी ३.३० वा. : कीर्ती कॉलेज : हर हर गंगे

दुपारी ४.३० वा. : महात्मा फुले महाविद्यालय : अर्जूनाचं झाड

सायंकाळी ५.३० वा : सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांची मुलाखत

सायंकाळी ६ वाजता : बक्षीस वितरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com