Sachin Waze: सचिन वाझेचा राजकीय भूकंप;  जेलमधील वाझे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
Sachin Waze Allegation On Anil Deshmukh

Sachin Waze: सचिन वाझेचा राजकीय भूकंप; जेलमधील वाझे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

Sachin Waze Allegation On Anil Deshmukh: माजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केलेत. देशमुखांवर आरोप करण्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
Published on

100 कोटी वसुलीच्या जुन्या प्रकरणाला पुन्हा एक नवं वळण लागलंय. जेलमध्ये असलेला अँटिलिया स्फोटक प्रकरणातला आरोपी सचिन वाझेनं देशमुखांवर आरोप केले आहेत. याबाबत त्यानं फडणवीसांना पत्रच पाठवलंय. या पत्रात जयंत पाटलांच्या नावाचाही उल्लेख आहे. एकमेकांविरोधात पेनड्राईव्ह काढण्याची भाषा सुरू असताना यात अचानक वाझेनं राजकीय भूखंप केल्यानं राजकारण तापलंय...वाझे जेलबाहेर कसा आला? वाझेनं नेमके काय आरोप केले? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्या प्रकरणंवरून नवं राजकारण सुरू झालंय. मविआ सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवरील 100 कोटींच्या वसुलीचे आरोपांना पुन्हा धार आलीय. कारण अॅन्टिलिया स्फोटक आणि मनसुख हिरण हत्येप्रकरणी जेलमध्ये असलेला एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेनं थेट अनिल देशमुखांवरांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे गोळा करत असल्याचा आरोप सचिन वाझेनं केलाय. एवढंच नव्हे तर वाझेन आपल्या आरोपांच्या फैरी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवरही झाडल्या आहेत. त्यामुळे यावरून आणखीनच राजकारण पेटणार आहे. वाझेनं केवळ आरोप केले नाहीत तर त्यानं देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात पत्रही लिहिलंय. वाझेनं केलेल्या आरोपांवर अनिल देशमुखांनी सवाल उपस्थित केले आहेत. आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी वाझेंच्या माध्यमातून आरोप केल्याचा दावा देशमुखांनी केलाय. तर या आरोपांची चौकशी करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

फडणवीसांचं ऐकलं नाही म्हणून 100 कोटीच्या प्रकरणात गोवल्याचं सांगत देशमुखांनी फडणवीसांवर अनेक खऴबळजनक आरोप केले होते. त्यावर दोघांनीही एकमेकांविरोधात पुरावे असल्याचे दावे-प्रतिदावे केले होते. मात्र कुणीही अजून पेनड्राईव्ह बाहेर काढला नाही. मात्र जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेची या प्रकरणात अचानक एण्ट्री झाली. वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना वाझेनं देशमुखांवर आरोप केले आणि पुन्हा खळबळ उडाली. त्यामुळे हे प्रकरणाला आणखीनच धार आली. कारण राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं. आणि हे टायमिंग कुणाच्या फायद्याचं आहे हे पुढच्या काळात कळेलच.

Sachin Waze: सचिन वाझेचा राजकीय भूकंप;  जेलमधील वाझे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
Jayant Patil On Sachin Vaze: 100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेचा गंभीर आरोप, जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com