Ajit Pawar Is New State President of NCP: ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादीत पुन्हा एकदा भाकरी फिरण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीला दोन महिन्यात नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. यामध्येच अजित पवार यांचं नाव आघाडीवर असून ते राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
राष्ट्रवादीत लवकरच संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. यानंतरही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठक होण्यापूर्वी काही राष्ट्रवादी नेत्यांची चर्चा झाली होती. या चर्चेत पुढील दोन महिन्यात पक्षांतर्गत निवडणूक पार पडणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशी माहिती समोर आलेली आहे. (Breaking Marathi News)
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात संघटनात्म बदल होणार असल्याची चर्चा होती. यातच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी थेटपणे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्हक्त केली होती. यानंतर या चर्चाना सुरुवात झाली होती. पुढील दोन महिन्यात या निवडणुका होणार आहेत. यामध्ये ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळू शकतात. (Latest Marathi News)
असं असलं तरी राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखीन काही नावे चर्चेत आहेत. यातच छगन भुजबळ यांनी जिंतेद्र आव्हाड, धनंजय मुडें यांच्या नावांची शिफारस केल्याचं समजतंय. मात्र अजित पवार हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.