आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या रडावर आहेत. त्यात भाजपत राष्ट्रीय स्तरावरील सत्तास्पर्धा तीव्र झालीये. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यातच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यक्रम रद्द करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे या भेटीबाबत जोरदार राजकीय चर्चा रंगलीय.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी मंत्रीपदाच्या कामकाजातून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती. आगामी विधानसभेसाठी पक्षाचं पूर्णवेळ काम करण्याची मागणीही फडणवीसांनी केली. त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती.
मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मध्यस्तीनंतर फडणवीसांचं मन वळवण्यात आल्याचं कळतंय. मात्र, फडणवीसांनी नुकतीच सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या चर्चांना वेग आलाय.
अध्यक्षपदासाठीच्या इतर नावांवरून संघ आणि भाजपात मतभेद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी फडणवीसांचे चांगले संबंध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फडणवीसांच्या नावावर आक्षेप नाही. कूटनीती, दूरदृष्टी, अभ्यासू, राजकीय नेमकेपणा फडणवीसांच्या जमेच्या बाजू आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी अनेक राजकीय संकटातून पक्षाला सुरक्षित बाहेर काढलंय. त्यांचं नेतृत्व भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर खरं उतरलंय. त्यामुळे संघ मुख्यालयातून हिरवा कंदील घेऊन फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार का? त्यांच्यानंतर राज्यात नवं नेतृत्व उभं राहणार का? आणि भाजपला त्याचा फायदा होणार का? हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.