...तर भोंदू साधू-साध्वींना थारा दिला नसता; भगवद् गीतेवरुन सचिन सावंतांची भाजपवर टीका

महाराष्ट्रातही भगवद् गीता शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात यावा अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
Sachin Sawant
Sachin SawantSaam Tv
Published On: 

मुंबई: गुजरात सरकारने (Gujarat Government) गुरुवारी (17 मार्च) रोजी श्रीमद भगवद् गीता सार हा शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमाचा भाग असेल अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही भगवत गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात यावा अशी मागणी भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. यावर काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी ट्विट (Tweet) करुन भाजपवर (BJP) टीका केली आहे.

''भगवद्गीता संघ/भाजपा नेत्यांनी वाचली असती तर द्वेष, तिरस्कार सोडला असता (अ.१२/श्लोक १३-१४) भोंदू साधू,साध्वी योगींना थारा दिला नसता (अ.६/४ व२९) मोदी कमी झोपतात सांगितले नसते (अ.६/१६) १६वा अध्याय भाजपासाठीच आहे. गीतेनुसार भाजपा/संघ नेत्यांना मोक्ष मिळणे मुश्कील आहे (अ१८/२७,२८,७१)'', अशी टीका सचिन सावंत यांनी ट्विट करुन केली आहे.

या निर्णयाने गुजरात सरकारचे (Gujrat Government) कौतुक होत आहे. तर टीकाही होतं आहे. यावरुन काल आपचे नेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी हा निर्णय म्हणजे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. पण हा निर्णय जी लोक घेत आहेत. पहिल्यांदा त्यांनी गीता मधील मुल्यांचे पालन केले पाहिजे. त्यांचे कर्म रावणासारखे आहेत आणि ते बालत आहेत गीतेविषयी, अशी टीका मनीष सिसोदिया यांनी केला होती.

गुजरातमध्ये नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलांना श्रीमद्भगवद् गीताचे (Bhagavad Gita) तत्त्वे आणि मूल्ये शिकवली जाणार आहेत.

गुजरातमध्ये निवडणुका होणार असताना घोषणा

शालेय मुलांना गीता आणि त्यातील मूल्यांची माहिती व्हावी, यासाठी प्रार्थना, श्लोक, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील श्रीमद्भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होणार असताना गुजरात सरकारने (Gujrat Government) शाळांमध्ये श्रीमद्भगवद् गीता शिकवण्याची घोषणा केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.