Eknath Shinde News: राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढलंय, 'सामना'तून भलताच संशय व्यक्त

राजकीय विरोधकांच्या होणाऱ्या अपघातामुळे अघोरी विषयांची चर्चा सुरु झाली आहे.
eknath shinde
eknath shinde saam tv
Published On

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. जादुटोणा, लिंबू मिरची, टाचण्या, काळ्या बाहुल्या, रेडा बळी ही महाराष्ट्राची ओळख असता कामा नये. मुख्यमंत्री नागपुरातील रेशीमबागेत गेले तेव्हा लोकांनी त्यांची गमंत केली.

मुख्यमंत्री येऊन गेलेल्या रेशीमबागेत टाचण्या, लिंबू पडले आहेत का तपासा याची सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी, असा सध्या चेष्टेचा विषय झालाय. राजकीय विरोधकांच्या होणाऱ्या अपघातामुळे अघोरी विषयांची चर्चा सुरु झाली आहे.

eknath shinde
Maharashtra Investment: डाव्होसमध्ये राज्याला पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक, सुमारे १०,००० रोजगार उपलब्ध होणार

विरोधकांच्या जीवितांच्या रक्षणासाठी निदान फडणवीसांनी पांडूरायालाला साकडे घालवं, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरूद्ध नेहमी लढा दिला, अंधश्रद्धेविरूद्द कायदे केले पण मिंदे सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळतेय.

मिंधे सरकार आल्यापासून अनेकांचे अपघात सुरु आहेत, त्यात विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाले, ते त्या काळात भाजप विरोधात बोलत होते. मिंदे सरकार येण्याआधीपासून त्यांचे अघोरी प्रकार सुरू होते. वर्षावरील अखेरच्या काळात उद्धव ठाकरेंना भयंकर आजारास समोरे जावे लागले. (Latest Marathi News)

मविआच्या प्रमुख लोकांवर अपघात, घातपात, चौकशांची संकटे एका पाठोपाठ कोसळत आहे. यामागे मुख्यमंत्र्यांचे जादूटोणा प्रेम आहे, असं वाटत असेल तर संत गाडगे महाराज प्रबोनकार ठाकरे अशा समाज सुधारणांचा पराभव ठरेल.

'सामना'त नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची यज्ञ वगैरे अघोरी प्रथांना स्थान नाही, पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही. काल पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला.

उपस्थितांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले. पवार हे तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जायला निघाले. मध्येच वीज गेली आणि चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या आधीच लिफ्ट धाडकन खाली कोसळली.

eknath shinde
Maharashtra Politics : ठाकरे की शिंदे? खरी शिवसेना कुणाची? आज होणार सुनावणी; निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष

लोक म्हणतात की, काहीतरी गडबड आहे! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नागपूर अधिवेशनाच्या वेळी अपघातात जखमी झाले व त्यांचा उजवा खांदा निखळल्याने ते आजही सक्रिय नाहीत. विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांना त्यांच्याच बीड जिल्हय़ात मोठा अपघात झाला. त्यांची कार चक्काचूर झाली. मुंडे थोडक्यात बचावले, पण त्यांच्या छातीच्या बरगडय़ा तुटल्याने ते इस्पितळात खाटेला खिळून आहेत.

शिवसेनेचे संजय राऊत यांनाही नाहक तुरुंगात जावे लागले ते याच राजकीय जादूटोण्यामुळे. विनायक मेटे यांनाही अपघाती मरण आले. ते गेल्या काही काळापासून भाजपच्या विरोधात बोलू लागले होते. विरोधकांना अशा प्रकारे इस्पितळांच्या खाटांवर खिळवून ठेवणारी ही मालिका काय सांगते? यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना 'वर्षा'वरील अखेरच्या काळात भयंकर आजारास सामोरे जावे लागले. त्यांच्यावर अचानक अवघड व जीवघेण्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे काही काळ ते अत्यवस्थ झाले होते आणि त्याच वेळी महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयोग सुरू झाले.

म्हणजे महाराष्ट्रातील 'करणी टोळी'चे अघोरी प्रयोग हे आधीपासूनच सुरू होते. या अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला बसत आहेत. ही एक प्रकारे अंधश्रद्धा असली तरी लोकांच्या मनात या अंधश्रद्धा घट्ट रुजत आहेत हे काही बरे नाही. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख लोकांवर अपघात, घातपात, चौकश्यांची संकटे एकापाठोपाठ कोसळत आहेत. त्यामागे मुख्यमंत्र्यांचे 'जादूटोणा' प्रेम आहे असे लोकांना वाटत असेल तर संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे अशा अंधश्रद्धांविरुद्ध लढणाऱ्या समाजधुरिणांचा तो पराभव ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com