...तर आम्ही पण आंदोलन छेडणार, रामदास आठवले यांची 'पठाण' वादात उडी

कोणताच रंग बेशरम नसतो. त्यामुळे तो चित्रपटातून हटवायला हवा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesaam tv

मुंबई : शाहरुख खान, दीपिक पदुकोन यांच्या आगामी पठान चित्रपटावरून मोठं वादंग सुरु आहे. भाजपने पठान सिनेमाला मोठा विरोध केला आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. बेशरम रंग गाण्यातील काही दृष्य हटवावी अशी मागणी रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी केली आहे.

पठाण चित्रपटाला आमचा विरोध नाही. पण चित्रपटात भगव्या रंगाला बेशरम रंग असं गीतात म्हटलं आहे. भगवा रंग हा भाजप, शिवसेनेचा तसेच तो गौतम बुद्धांच्या पेहरावात हा रंग आहे. तो रंग शांततेचा प्रतीक आहे. त्यामुळे या चित्रपटातून बेशरम शब्द काढला पाहिजे. असं न झाल्यास आम्ही पण आंदोलन छेडू. कोणताच रंग बेशरम नसतो. त्यामुळे तो चित्रपटातून हटवायला हवा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Ramdas Athawale
चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलं? एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद धोक्यात?

महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीका

महाविकासआघाडीचा कालचा मोर्चा फार काही मोठा नव्हता. आम्ही असे अनेक विराट मोर्चे काढलेले आहेत. आमची दुटप्पी भूमिका नाही. महापुरुषांबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही, याबाबत राज्यपालांबाबत आम्ही उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र आम्ही शांत राहण्याची भूमिका घेतो, असंही त्यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com