मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेची किल्ली शिंदे-फडणवीस सरकारच्या हाती आली. मात्र मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या जागी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा स्वत: देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती.
मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी का? याचं सविस्तर उत्तर फडणवीसांनी वेळोवेळी दिलं आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
मी प्रदेशध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू, असंही बावनकुळे यांनी म्हटलं.
आता सर्व जातीच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. येणाऱ्या आगामी निवडणूकांमध्ये पुन्हा कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित नागरिकांना विचारला होता. त्यावेळी लोकांकडून फडणवीस असे उत्तर आल्यानंतर बावनकुळेंनी आता आपण त्यांच्यापाठीमागे उभी राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्यात मोठे फेरबदल येत्या होणार असे अंदाज वर्तवले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.