Maharashtra Politics: सत्ता जाताच उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरचा मास्क उतरला; दीपक केसरकर यांची बोचरी टीका

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर महाराष्ट्र ऍक्टिव्ह झाला का..? असा सवाल करत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
Deepak Kesarkar On Uddhav ThackeraySaam TV
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी

Deepak Kesarkar Latest News: सत्ता जाताच उद्धव ठाकरेंच्या तोंडावरचा मास्क उतरला अशी बोचरी टीका शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट महाराष्ट्रात घडतं असं म्हणत त्यांनी राऊतांवरही निशाणा साधला आहे. दिपक केसरकर (Deepak Kesarkar) हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना होण्यापूर्वी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला पोहचले. यावेळी दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही बोचरी टीका केली आहे. (Latest Marathi News)

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
FIFA WC Final: फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स आमनेसामने; गोल्डन बूटसाठी मेस्सी-एम्बाप्पे यांच्यात लढत

दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता रस्त्यावर उतरले हे चांगले आहे. मात्र ज्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची संधी होती तेव्हा उतरायला हवं होतं. जोपर्यंत सरकार अस्तित्वात होतं तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता मात्र, सत्ता जाताच दुसऱ्या क्षणी मास्क तो उतरला अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांची आमच्यासारख्या आमदारालासुद्धा भेट मिळत नसल्याने महाराष्ट्र ठप्प झाला होता. विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर महाराष्ट्र ऍक्टिव्ह झाला का..? असा सवाल करत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Maharashtra News)

संजय राऊतांना टोला

मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी संजय राऊतांनाही टोला लगावला आहे, ते म्हणाले संजय राऊक जे बोलतात त्याच्या उलटं महाराष्ट्रात घडतं. त्यांनी वाईट बोललं की चांगलंच होत असतं. ज्यांच्याबद्दल संजय राऊत वाईट बोलले ती लोक मोठीचं झाली. संजय राऊतांनी दररोज वाईट बोलत राहावं, आम्ही आमचं काम चालूच ठेऊ असा टोला केसरकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
RedInk Awards 2022: 'साम'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; सोनाली शिंदे यांना मुंबई प्रेस क्लबचा 'रेड इंक' पुरस्कार

पुढे ते म्हणाले की, विरोधी पक्ष हा आंदोलन करतच असतो. मात्र नागरिकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हिंदू देव-देवतांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता आणि दुसरीकडे महाराष्ट्र प्रेमी असल्याचं भासवता. संत लोकांचा अपमान करणाऱ्यांना बरोबर घेऊन जाताना सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही. अशी टीका केसरकर यांनी ठाकरे गटावर केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com