Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी यांना झटका, अखेर वाय प्लस सुरक्षा हटवली; हल्ल्यामागचं गूढ कायम

Rana Suryavanshi attack case latest update: उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्या सुरक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांची वाय प्लस सुरक्षा हटवण्यात आली.
Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी यांना झटका, अखेर वाय प्लस सुरक्षा हटवली; हल्ल्यामागचं गूढ कायम
Rana SuryavanshiSaam Tv
Published On: 
  • राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठी अपडेट

  • राणा सूर्यवंशी यांची वाय प्लस सुरक्षा हटवण्यात आली

  • बारामतीतील गोजुबावी येथे राणा सूर्यवंशी यांच्यावर झाला होता हल्ला

सागर आव्हाड, पुणे

वादग्रस्त व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांना पुरविण्यात आलेली वाय प्लस दर्जाची पोलिस सुरक्षा अखेर काढून घेण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे, राणा यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याला १३ दिवस उलटूनही या घटनेमागील नेमके कारण आणि त्याचे सूत्रधार अद्याप समोर आलेले नाहीत. पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू असतानाच राणा यांची उच्चस्तरीय सुरक्षा हटविण्यात आल्याने या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आदेशानुसार राणा सूर्यवंशी यांना वाय प्लस दर्जाची वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात आली होती. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात होते. त्यांना एस्कॉर्टची सुविधाही देण्यात आली होती. मात्र, आता ही सुरक्षा व्यवस्था मागे घेण्यात आली आहे. यापुढे त्यांना केवळ एक गनमॅन पोलीस संरक्षण म्हणून देण्यात आला आहे.

नेमका हल्ला होता की कट? तपासाला वेगवेगळे वळण -

१८ ऑक्टोबर रोजी बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात सायंकाळच्या सुमारास राणा सूर्यवंशी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला या घटनेत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुढील तपासात धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले. मात्र, तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या हल्ल्याच्या घटनेभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले. पोलिसांच्या हाती लागलेल्या महत्त्वाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा यांच्या निकटवर्तीयांपैकी तीन व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता लक्षात येताच या तिघांनी पलायन केल्याचे सांगण्यात येते. हे तिघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी यांना झटका, अखेर वाय प्लस सुरक्षा हटवली; हल्ल्यामागचं गूढ कायम
Pune Crime: रांजणगावात पुन्हा रक्तरंजित हल्ला; कोयता, दगड अन् फायटरने तरुणांना बेदम मारहाण

पोलीस महासंचालकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती -

हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने राज्य पोलीस दलातही त्याचे पडसाद उमटले. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत राणा सूर्यवंशी यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याची माहिती आहे. राणा यांच्या सुरक्षा ताफ्यात पुणे शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील पोलीस कर्मचारीही तैनात असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनाबाबत आणि त्यासंदर्भातील प्रक्रियेबाबत पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते.या संदर्भात झालेली बैठक तब्बल तीन तास चालली. राणा यांना कोणत्या निकषांवर आणि कोणत्या परिस्थितीत वाय प्लस सुरक्षा देण्यात आली, यासह सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेण्यात आला. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी यांना झटका, अखेर वाय प्लस सुरक्षा हटवली; हल्ल्यामागचं गूढ कायम
Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

सप्टेंबर २०२५ मध्येही झाला होता हल्ला -

राणा सूर्यवंशी यांची राणा शिपिंग कंपनीसह गडचिरोली परिसरातही काही व्यावसायिक गुंतवणूक आणि व्यवसाय असल्याची माहिती आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये अक्कलकोट येथेही त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर त्यांना उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. राणा यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत होता. त्यांना एस्कॉर्ट वाहनाची सुविधाही देण्यात आली होती. राज्यातील अनेक मंत्र्यांशी त्यांचे निकटचे संबंध असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे एका व्यावसायिकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्याचा निर्णय सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता.

आता केवळ एका गनमॅनचे संरक्षण -

राणा सूर्यवंशी हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरपट्टा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांची पूर्वीची उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्यानंतर आता त्यांना पुढील आदेश येईपर्यंत केवळ एका गनमॅनचे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिले आहेत.

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी यांना झटका, अखेर वाय प्लस सुरक्षा हटवली; हल्ल्यामागचं गूढ कायम
Pune Crime: पुणे हादरले! शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, प्रॉपर्टीसाठी आजोबानेच नातवाला संपवलं

१३ दिवसांनंतरही तपास अपूर्ण -

राणा यांच्यावरील हल्ल्याला १३ दिवसांचा कालावधी उलटला आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयाच्या भोवऱ्यात आलेले राणा यांचे तीन निकटवर्तीय अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या तिघांना पकडल्यानंतरच हल्ल्यामागील नेमके कारण, त्याचे नियोजन आणि या प्रकरणातील इतर संबंधित बाबी स्पष्ट होतील, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दुसरीकडे, ज्या व्यक्तीवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला, त्याच व्यक्तीची वाय प्लस सुरक्षा आता हटविण्यात आली आहे. त्यामुळे राणा यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यामागील निकष काय होते, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी कोणत्या होत्या आणि हल्ल्याच्या तपासाचे पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षा हटविण्याचा निर्णय आणि हल्ल्याच्या तपासाची सद्यस्थिती यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी यांना झटका, अखेर वाय प्लस सुरक्षा हटवली; हल्ल्यामागचं गूढ कायम
Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.