निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. त्याला कारण ठरलं खुद्द राज ठाकरेंनी केलेलं मोठं वक्तव्य... ठाकरे बंधू एकत्र न येण्यामागे आतले बाहेरचे लोक असल्याची कबूली राज ठाकरेंनी दिलीये. यावेळी राज ठाकरेंनी एक खंत व्यक्त केली काय म्हणाले राज पाहूया...
चंद्रावर जाणं जसं स्वप्न असतं तसं महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणं हे तमाम मराठी जनाचं स्वप्नयं. गेल्या 20 वर्षांपासून ठाकरें बंधूंनी एकत्र यावं असे अनेक प्रयत्न झाले पण या प्रयत्नांना काही यश आलं नाही.
आता ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केलाय. विशेष म्हणजे दोघा भावांना दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्यातं जाहीर विधान त्यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय. पाहूया,
एकत्र येण्यावर काय म्हणाले राज?
जगातले दुश्मन एकत्र येतात, आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवीच
मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेकांचे प्रयत्न
उद्धव ठाकरेंना भावापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी जवळचे वाटतात
एकत्र येण्यासाठी माझ्या इच्छेचा विषय नाही चर्चा होणं गरजेचं
बाळासाहेबांचं नाव न घेणाऱ्यांसोबत व्यभिचार करायला वेळ याची मला खंत
माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरेंच्या विरोधात ठाकरे गटानं उमेदवार दिल्यानं ठाकरे बंधूमधील तणाव आणखीन वाढला. त्यानंतर अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेनंतर राज ठाकरेंनी टाळीसाठी पुढे केलेला हात हे भावनिक राजकारण आहे की खरंच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा हात हातात घेऊन एकत्र यायचं असा प्रश्नंय.
याआधी 2014 ला शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव आणि राज यांचे फोनवरुन बोलणं झालं होतं. तेव्हा राज-उद्धव एकत्र येणार असं वाटत असतांना बोलणी फिस्कटली. परंतू या काळात जेव्हा जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले तेव्हा तेव्हा मराठी जनांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे आता जिथे प्रत्येक पक्ष फुटत असतांना महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे बंधू एकत्र येतात का आणि मराठी जनांची इच्छा पुर्ण होते का हे पाहणं महत्वाचं ठरणारेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.