राज्यातील राजकीय उलाढालीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नेत्यांची वाभाडे काढले. चांदीवली येथे महेंद्र भानुशाली यांचा प्रचार सभेत बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील पुढील राजकीय परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.
राज्यातील झालेल्या राजकीय उलथापालथीवरून राज ठाकरेंनी नेत्यांना सुनावलेत. पैशाने विकले जाणाऱ्या नेत्यांना या विधानसभेत निवडून देऊ नका असे आवाहनही राज ठाकरेंनी यावेळी केले. मतदाराना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले, 2024 ची निवडणूक मजाकमध्ये घेऊ नका, कारण ज्या प्रकारच्या गोष्टी झाल्या आहेत.
उद्या जर समजा अशाच प्रकारच्या गद्दारांना पाठिंबा मिळणार असेल तर त्याचा समज, असा होईल की मी जे करत आहे मी जे केला आहे, ते बरोबर केले आहे. भविष्यातल्या महाराष्ट्राबद्दल देवच वाचवू शकतो. कोणीही नाही वाचू शकत सगळ्यांचा समज असा होणार आहे असेच पैसे घेऊन विकले गेले पाहिजे. आज त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांना आपण काही जरी केलं लोक आपल्याला मतदान करतात, असे ते म्हणाले.
चांदीवलीत मनसेकडून महेंद्र भानुशाली यांना उमेदवारी देण्यात आलीय. भानुशाली यांच्यासाठी मते मागताना राज ठाकरे विरोधी उमेदवारांवर घरसले. आमचा महिंद्रा येथे उभा आहे. येथे अजून दोन लांडे उभे आहेत दोन का एक लांडे उभे आहेत. त्यांच्यासाठी गद्दार आणि हरामखोर हे शब्द कमी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. दिलीप लांडे हे आधी मनसेचे नगरसेवक होते, त्यांनी मनसेतून बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावरून राज ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
लांडे हे नगरसेवक झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये चार चार वर्ष बसले. दुसऱ्यांना संधी द्यावी म्हणून लांडे यांनी मनसेतून शिवसेनेत गेले. त्यावरून बोलताना राज ठाकरे म्हणाले, दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांना बाजुला केला तर हे शिवसेनेत विकले गेले. ज्यावेळी ते विकल्या गेले त्यावेळी अमित ठाकरे आजारी होता, असं राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.