Mahad Accident News: महाडमध्ये भरधाव टेम्पोने चौघांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Raigad Mahad Accident News : महाडमध्ये भरधाव टेम्पोन चार पादचाऱ्यांना उडवलं. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
महाडमध्ये भरधाव टेम्पोने चौघांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Raigad Mahad Accident NewsSaam TV

महाड तालुक्यातील काळीजकोंड परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

महाडमध्ये भरधाव टेम्पोने चौघांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Bhiwandi Fire News: भिवंडीत डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट

रवींद्र ढेबे आणि सचिन ढेबे अशी मृतांची नावं आहे. तर जखमी झालेल्या संतोष ढेबे आणि निलेश ढेबे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हे महाड एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होते. सोमवारी रात्रपाळीसाठी चौघेही कामावर निघाले होते. रस्त्यावरून पायी जात असताना काळीजकोंड परिसरात एका भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यातील दोन तरुण हवेत उडून जमिनीवर आदळले. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.

वर्ध्यात भरधाव कारची ऑटो रिक्षाला धडक

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव फॉर्च्यूनर कारने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की रिक्षाने दोन ते तीन पलट्या मारल्या. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महाडमध्ये भरधाव टेम्पोने चौघांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Bhima River Bridge Pillars Collapsed: पुणे-नगरला जोडणाऱ्या दौंड-गार गावादरम्यान भीमा नदीवरील पुलाचे महाकाय खांब कोसळले, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com