Shivsena-Sambhaji Brigade news
Shivsena-Sambhaji Brigade news saam tv

Shivsena-Sambhaji Brigade : 'राज्यात लवकरच संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीचा मुख्यंमंत्री असणार'

राज्यात लवकरच संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीचा मुख्यंत्री असणार,असा विश्वास पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.
Published on

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Maharashtra Political News : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेवर (Shivsena) मोठं पक्ष संकट उभ ठाकलं आहे. या संकटसमयी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे. आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार अशी घोषणा आज संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे यांच्यातर्फे करण्यात आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात लवकरच संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीचा मुख्यंत्री असणार,असा विश्वास पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.

Shivsena-Sambhaji Brigade news
मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाष्य केलं आहे. खेडेकर म्हणाले, 'शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात झालेल्या युतीचे मी स्वागत करतो.ही युती लवकरच राज्यात वेगळं वळण देईल. सर्व निवडणूका एकत्र लढणार. किमान समान कार्यक्रम राबवून आगामी काळात आमचे नेते वाटाघाटी करतील. राजकिय संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक संभाजी ब्रिगेड अशी कधी वेगळी नव्हती ती एकत्रच होती'.

Shivsena-Sambhaji Brigade news
'उद्धव ठाकरे हे शरद पवारांना विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत'; भाजपची जोरदार टीका

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या विचारधारेवर भाष्य करताना खेडेकर म्हणाले, 'संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती राजकीय आहे. राजकारणापुरती मर्यादीत आहे. सामाजिक भूमिका वेगळ्या असू शकतात.शिवसेनेचं हिंदूत्व सावरकर, गोळवलकर यांनी लिहिलेल्या हिंदुत्वापेत्रा वेगळं आहे'. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर खेडेकर म्हणाले,'राज्यघटनेच्या चौकटीत जे बसेल ते मिळावं. आरक्षणाचा विषय शिवसेना प्रमुखांना जो मान्य असेल त्याप्रमाणे असेल'. तसेच राज्यात लवकरच संभाजी ब्रिगेड-शिवसेना मुख्यमंत्री असणार,असा विश्वास पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com