मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार आहेत, या संदर्भात आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
Published On

मुंबई: शिवसेना (ShivSena) आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार आहेत, या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. सध्या लोकशाही धोक्यात आली आहे, यासाठी आम्ही नवे समीकरण जुळवत आहोत, लवकरच मोठा मेळावा घेणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभापर्यंत आम्ही एकत्र राहणार आहोत, असंही खेडेकर म्हणाले.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा! SC म्हणाले, खटला चालणार नाही

शिवेसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. यानंतर राज्यभरातून शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती केली आहे.

यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत युती करणार असल्याचे जाहीर केले.

Uddhav Thackeray
Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांचे जाता-जाता राहुल गांधींवर गंभीर आरोप, ५ पानी पत्रात काय म्हटलं?

लढावय्या सहकाऱ्यांचे स्वागत आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे काही नसता सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युती नाही असेहे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच, आमचं हिंदुत्व पटल्याने आम्ही एकत्र येत आहोत. लवकरच महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घेणार आहे.

सुप्रीम कोर्टातील निकाल बेबंदशाही की लोकशाही हे ठरवणारा आहे. ही वैचारीक युती आहे. जे बिघडलंय ते शिवरायांचा महाराष्ट्राचा नाही. आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत युती केली होती. संघाची विचारधारा घेवून ते जातायत का त्यांना विचार ते मोहन भागवतांच्या विचारावर ते जात आहेत का, असा सवालही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com