Pune : गुरुवारी पुण्यात पाणीबाणी!  शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद; 'या' भागांना बसणार फटका

Pune Water Crisis : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! १० सप्टेंबर रोजी जलकेंद्रांतील देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. ११ सप्टेंबरला उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
Pune water supply shutdown
Pune water supply shutdownAI Image
Published On
Summary
  • पुण्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार

  • १० सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा राहणार बंद

  • जलकेंद्रांमध्ये विद्युत पंपिंगच्या तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे

  • ११ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा होण्याची शक्यता

पुणेकरांनो पाणी वाया घालवत असाल तर थांबा. कारण येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक तेवढे पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील विविध जलकेंद्रांमध्ये विद्युत पंपिंगची तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर रोजी पुण्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार रात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

१२ तास पाणीपुरवठा राहणार बंद

या कामांचा परिणाम जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, स्टेज-२ पर्वती एच.एल.आर. झोन, भामा आसखेड बँकवेल, वारजे जलकेंद्र तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या विविध पाणीपुरवठा क्षेत्रांवर होणार आहे. पर्वती एच.एल.आर. टाकी परिसरातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, इंदिरानगर, पर्वती गावठाण, प्रेमनगर, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिलानगर, कोंढवा खुर्द आदी भागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

Pune water supply shutdown
Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

'या' भागांना पाणीपुरवठा बंदचा फटका

भामा आसखेड योजनेअंतर्गत लोहगाव, कळस-धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, येरवडा, खराडी तसेच लगतच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, कोथरूड, कर्वेनगर, मयूर कॉलनी आदी भागांनाही पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे.

Pune water supply shutdown
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

पाणी पुरवठा कधी होणार सुरळीत?

चांदणी चौक टाकी परिसरातील बावधन, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस रोड, भुसारी कॉलनी आदी भाग, तर गांधी भवन टाकी परिसरातील वारजे-माळवाडी, कोथरूड, हिंगणे, कर्वेनगर आणि आसपासच्या भागांचा समावेश आहे. पॅनकार्ड क्लब जीएसआर परिसरातील बाणेर, बालेवाडी आणि पॅनकार्ड रोड परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय जुने-नवे होळकर जलकेंद्र, कोंढवे-धावडे आणि वडगाव जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या विविध भागांवरही परिणाम होणार आहे. कात्रज, धनकवडी, येवलेवाडी, आंबेगाव, सुखसागरनगर, सिंहगड रोड, धायरी, वडगाव आदी परिसरातही पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com