Water Crisis : पुणेकरांवर पाणीसंकट! 'या' भागात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार; वाचा संपूर्ण माहिती

Pune Water Crisis news : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा केवळ ५ टीएमसीवर आल्याने पुणे महानगरपालिकेने शहरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.
PUNE WATER CRISIS: ALTERNATE-DAY WATER SUPPLY BEGINS AS KHADAKWASLA DAM STORAGE DROPS TO 5 TMC
PUNE WATER CRISIS: ALTERNATE-DAY WATER SUPPLY BEGINS AS KHADAKWASLA DAM STORAGE DROPS TO 5 TMCSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात आजपासून पाणीकपात लागू

  • खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा केवळ 5 टीएमसीवर

  • आजपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

सागर आव्हाड, पुणे

Pune Water Crisis News एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतांश भागात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.पुण्यातही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणे महानगरपालिकेने शहरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांमध्ये सध्या केवळ पाच टीएमसी पाणी शिल्लक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेने सम आणि विषम तारखांनुसार शहरातील विविध भागांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर केले आहे. या नव्या नियोजनामुळे अनेक भागांमध्ये दररोजच्या ऐवजी एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. शहरातील आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, शिवाजीनगर, एरंडवणे, बोपोडी, बाणेर, औंध, बालेवाडी, खडकी, वारजे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर आणि इतर अनेक भागांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

PUNE WATER CRISIS: ALTERNATE-DAY WATER SUPPLY BEGINS AS KHADAKWASLA DAM STORAGE DROPS TO 5 TMC
Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम, 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट; वाचा हवामान अंदाज

महापालिकेच्या माहितीनुसार, सम तारखेला शहरातील काही ठरविक भागांना पाणीपुरवठा करण्यात येईल, तर विषम तारखेला उरलेल्या भागांना पाणी दिले जाईल. काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ ठरवण्यात आली असून नागरिकांनी त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ससे गाव परिसरात सम आणि विषम दोन्ही तारखांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट, रामनगर, शिवणे, उत्तमनगर आणि संबंधित परिसरांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ पूर्वीप्रमाणेच राहणार असली तरी तो एक दिवसाआड होणार आहे.

PUNE WATER CRISIS: ALTERNATE-DAY WATER SUPPLY BEGINS AS KHADAKWASLA DAM STORAGE DROPS TO 5 TMC
Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर काही क्षणांतच विमान कोसळलं; दुर्घटनेत १२ जणांचा जागीच मृत्यू

पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) नागरिकांना पाण्याची अपव्यय टाळण्याचे, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करण्याचे आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. मान्सून अद्याप संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला नसल्याने यंदा नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

PUNE WATER CRISIS: ALTERNATE-DAY WATER SUPPLY BEGINS AS KHADAKWASLA DAM STORAGE DROPS TO 5 TMC
Pranit More Show : "मी जे बोललो ते संपूर्ण सत्य नाही.." ३७० च्या बिर्याणीच्या वादानंतर हिमांशू जांगडाची पहिलीच प्रतिक्रिया

पाणी कपात होणारे भाग पुढीलप्रमाणे :

सम तारखेला पाणी पुरवठा होणारा भाग पुढील प्रमाणे

आपटे रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना परिसर, मनपा भवन, अमर सोसायटी, कांचनगल्ली, भोंडे कॉलनी, खिलारेवाडी, भालेकर चाळ, रजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण, बोपोडी, चिखलवाडी, एनसीएल,अभिमानश्री सोसायटी, चव्हाणनगर, बाणेर रस्ता उजवी बाजू, माऊली पेट्रोल पंपा पर्यंतचा सर्व भाग, औंध गाव, प्रिझम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत, भोसले नगर, अशोकनगर, रेंजहिल, खैरेवाडी, संपूर्ण बालेवाडी, बालेवाडी गावठाण, मोहननगर, , दत्तवाडी, मंगळवार पेठ, नानापेठ, भवानीपेठ, पुणे स्टेशन, सोमवार पेठ पोलिस वसाहत, ससून रुग्णालय, बी.टी.कवडे रस्ता दोन्ही बाजू, भीमनगर, घोरपडी (अंशतः), भारत फोर्ज कंपनी लगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पेट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, लक्ष्मीनगर, घोरपडी उर्वरित भाग - तारादत्त कॉलनी, डोबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल.

PUNE WATER CRISIS: ALTERNATE-DAY WATER SUPPLY BEGINS AS KHADAKWASLA DAM STORAGE DROPS TO 5 TMC
Heart Care : बदाम की शेंगदाणे? हृदयासाठी सर्वात जास्त काय फायदेशीर?

विषम तारखेला पाणी पुरवठा होणारा भाग पुढील प्रमाणे

एरंडवणा भाग, बावधन खुर्द, बावधन बुद्रूक, संतोषनगर संपुर्ण परिसर, दत्तनगर संपुर्ण परिसर, आंबेगाव खुर्द, सिध्दार्थनगर, चैत्रबन पद्मावती, तळजाई वसाहत, चव्हाणनगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत, पापळ वस्ती, गणपतनगर, (प्रत्येक भाग एक तास टप्प्याटप्याने), अप्पर पंपिंग मागील एरिया, बी-३७ मागील भाग, प्रसन्न सोसायटी, धर्मवीर पार्क, चिंतामणीनगर भाग १,२,३, बकुळनगर, शिवतेजनगर, खडकेवस्ती, सदगुरुनगर, ओंकारनगर, शक्ती बंगला, गायकवाड वस्ती, नॉर्थ मेन रोड, भाग्योदयनगर, शिवनेरी नगर, साईबाबा नगर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com