राज्यात ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पुण्यात एकगठ्ठा मतदारांचे पत्ते परस्पर बदलण्यात आल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उजेडात आला आहे. कोणत्याही प्रकारचे स्थलांतर न केलेले असताना, भलत्याच व्यक्तींनी मतदारांच्या नावाने बोगस अर्ज भरल्याचे समोर आलयं... या प्रकरणी आता राज्य निवडणुक अधिकाऱ्यांच्या कार्यालयानं चौकशीचे आदेश दिले असून, आता थेट गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? पाहूयात...
9 नोव्हेंबर 2025 शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित गव्हाणे यांनी भोसरी मतदारसंघात मतदारांचे पत्ते परस्पर बदलल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली...
तक्रारीत परस्पर पत्ते बदललेल्या 58 मतदारांची यादीही जोडण्यात आली
तसंच 15 हजारहून अधिक मतदारांचे पत्ते परस्पर बदलल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला
आता या प्रकरणात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयानं पुण्याच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशी करण्याचे आदेश दिलेत..
पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाणे, खेड आळंदी, आंबेगाव, खडकवासला, नाशिक पूर्व, भोसरी, कोथरूड आणि पिंपरी या आठ मतदारसंघांमधील निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला.
पिंपरीच्या सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय..
तसचं 'फॉर्म 8' चे अर्ज दाखल करण्यासाठी 4 मोबाईल वापरणाऱ्या 4 संशयितांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान मतदारांनीही 40 वर्षांपासून भोसरीत राहत असतानाही ठाणे, मुंबई सारख्या ठिकाणी नावं ट्रन्सफर करण्यात आल्याचा आरोप केलाय...
SIR प्रक्रियेनंतर देशातील 13 कोटी मतदारांची नावं यादीतून वगळल्याचा आरोप करण्यात आला होता..अशातच मतदारांची नावं परस्पर दुसऱ्या मतदारसंघात नोंदवली गेल्यानं पुण्यात एकच खळबळ माजलीय... लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या मतदारयाद्यांमध्ये अशा प्रकारे परस्पर फेरफार करून बोगस अर्ज दाखल करणे हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.
भोसरीसह पुणे परिसरात मतदारांचे परस्पर पत्ते बदलल्यानं निवडणुकांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालयं...आता या गैरप्रकारतल्या बड्या माशांवर पोलीस आणि निवडणूक आयोग कशी कारवाई करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.