शर्यतीत बैल बिथरला, दोन तरुण जीव मुठीत घेऊन पळाले; नेमकं काय घडलं? थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

बैलगाडा शर्यतीत बैल बिथरला आणि दोन तरुणांना जीव मुठीत घेऊन पळावं लागलं...मात्र बैलानं त्यांची पाठ काही सोडली नाही...त्यानंतर नेमकं काय घडलं? याचा थरार पाहूयात....
pune latest news
pune news Saam tv
Published On

पाटलांचा बैलगाडा अन् घाटात झालाय राडा...या गाण्यावर गौतमी पाटील लय नाचलीय ... पण बैलानं आता नाचवलंय दोन पठ्ठ्यांना... नुसतं नाचवलंच नाय तर पळवू पळवून दमवलंय अन् इलेक्ट्रिच्या डांबवर चढवलंय...

pune latest news
Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीत थरार! बैल बिथरला, गर्दीत शिरला, व्हिडिओ

घटना आंबेगावच्या बैलगाडा घाटातली हाय.... बैलगाडा शर्यत बघायला मोक्कार गर्दी जमली... या गर्दीत दोन दर्दीबी शिरली.... बंट्या अन् चिंट्या हौसनं बैलगाडा शर्यत बघायला गिली... पण पठ्ठ्यांची हौस बैलानं चांगलीच जिरवली..

शर्यत सुरु होण्याआधीच बैल बिथरला अन् थेट गर्दीत शिरला... बैल शिरताच नुसती दानादान... बघ्यांची पळता भुई थोडी.... बैल काय अवरात आवरनं... बैलाची नजर गेली बंट्या चिंट्याकडं... बैल मागं अन् बंट्या चिंट्या पुढं... बैल काय पिछ्या सोडना....

pune latest news
कलिंगड खाऊन कुटुंब संपलं, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? अनुभवी शेतकऱ्याने केला मोठा दावा

शेवटी इलेक्ट्रिकच्या डांबावर दोघांनी हाणली उडी... अन् माकडावानी चढून वर बसली... बैल खाली अन् दोघं डांबावर... खालनं बैल... गुरकावतून अन् वर दोघांची पाचवर धारणं...शेवटी बैल कसा बसा अटोक्यात अला अन् दोघांची सुटका झाली.. म्हणून म्हणतू जाव नका बैलाच्या अंगावर नाय तर घेल शिंगावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com