Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीत थरार! बैल बिथरला, गर्दीत शिरला, व्हिडिओ

pune bullock cart race viral video : पुण्यात बैलगाडा शर्यतीत एका बिथरलेल्या बैलाने चांगलाच धिंगाणा घातलाय. बैलाला जुंपत असताना तो अचानक उधळला. ज्यानं पकडलं होतं त्या व्यक्तीवरच थेट झेप घेतली. त्यानंतर सुसाट सुटलेला बैल थेट प्रेक्षकांच्या गर्दीत शिरला. त्यामुळं पळापळ झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या थरारक घटनेचा व्हिडिओ आता चांगलाच गाजतोय.

पुणे जिल्ह्यात यात्रा-जत्रांच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतींचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच उत्तर पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शर्यतीदरम्यान बिथरलेला बैल उधळला. ज्यानं त्याला पकडलं होतं, त्याच व्यक्तीवर झेप घेतली. त्यानंतर भर गर्दीत शिरला.

उत्तर पुणे जिल्ह्यातील शर्यतीत बैल छकड्याला जुंपला जात होता. पण तो अचानक बिथरला. बैलाला पकडून आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर त्याने झेप घेतली. त्यानंतर शर्यत बघायला आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीत घुसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाटात धावपळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com