Vaishnavi Hagawane : वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी २० ते २५ कार्यकर्ते घेऊन हॉस्पिटलमध्ये धडकला, राजेंद्र हगवणे फरार कसा झाला?

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत.
Vaishnavi Hagavane case How accused Rajendra Hagavane absconded
Vaishnavi Hagavane case How accused Rajendra Hagavane abscondedSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. मात्र, वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर फरार होते, त्यांना नंतर अटक करण्यात आली. १६ मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली, त्यानंतर वैष्णवीचा मृतदेह औंधच्या जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात आला, त्याच्या दुसऱ्या दिवशी १७ मे रोजी राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा मृतदेह पाहाण्यासाठी २० ते २५ कार्यकर्ते घेऊन रुग्णालयात आला होता, त्याचवेळी त्याला गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागली आणि तिथूनच तो फरार झाल्याची माहिती आता समोर येत आहे, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

Vaishnavi Hagavane case How accused Rajendra Hagavane absconded
Boat Accident : आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस, बोटीने समुद्रात फिरायला गेले असता अपघात; ८ वर्षीय लेकीवर...

वैष्णवी हगवणे प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंब आणि जालिंदर सुपेकर यांचे जवळचे संबंध आहेत. हगवणे कुटुंब सुपेकर यांचा त्यांच्या सूनांना धाक दाखवायचं, हगवणे कुटुंबाची सून मयुरीच्या आईने याविरोधात महिला आयोगाला एक पत्र देखील लिहिलं होतं, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

Vaishnavi Hagavane case How accused Rajendra Hagavane absconded
Central Railway : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार; नवी मार्गिका लवकरच सेवेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com