पुणे विद्यापीठात पेपर कॉपी-पेस्ट? विद्यार्थ्यांचा संताप उफाळला

Pune University Exam Row: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षेतील मोठा गोंधळ समोर आला आहे. डीटीएल पेपर कॉपी-पेस्ट असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून पुनर्परीक्षा व परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
Students protest against alleged copy-paste questions in Pune University engineering exams, demanding re-examination and transparency.
Students protest against alleged copy-paste questions in Pune University engineering exams, demanding re-examination and transparency.saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या ७५१ विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने दिलासा देताना मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ वर्षांच्या परीक्षांना बसण्याची परवानगी दिली. मात्र, काही विषयांत अनुत्तीर्ण होऊनही पुढील शैक्षणिक वर्षात तात्पुरत्या प्रवेशाची मुभा देणाऱ्या 'कॅरी ऑन' पद्धतीच्या वैधतेचा मुद्दा न्यायनिर्णयासाठी प्रलंबित आहे.

Students protest against alleged copy-paste questions in Pune University engineering exams, demanding re-examination and transparency.
मुंबई लोकलमध्ये महिलेचा अश्लील डान्स, पुरुषाला ही मारहाण; व्हिडिओ व्हायरल

राज्य सरकारने कॅरी ऑन पद्धतीबाबत १० फेब्रुवारी २०२५ रोजी शासननिर्णय काढला होता. या निर्णयाला आणि त्याअनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रक क्रमांक २०९ च्या कायदेशीर वैधतेला यापूर्वीच आव्हान देण्यात आले आहे. या निर्णयांद्वारे राज्य सरकार आणि विद्यापीठाने कॅरी ऑन धोरण पुन्हा लागू केले आणि त्याचा विस्तार केला. या सुधारित धोरणांतर्गत, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांचे काही विषय (बॅकलॉग) बाकी असूनही, काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून, पुढील शैक्षणिक वर्षात तात्पुरते प्रवेश घेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आज विविध संघटना ह्या आक्रमक झाल्या होत्या.

Students protest against alleged copy-paste questions in Pune University engineering exams, demanding re-examination and transparency.
Pav Price Hike: पेट्रोलनंतर आता 'पाव' महागले; एका लादीमागे इतक्या रुपयांची वाढ; वडापावचे दर वाढणार

प्रमुख मागण्या

विद्यापीठाने पुन्हा पेपर तपासावेत.

परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.

परीक्षा फॉर्म भरून घेण्यात यावेत.

पेपर तपासण्यात ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

विद्यापीठाने पेपर योग्य प्रकारे तपासले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com