दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी
Pune Tuljabhavani Temple theft video News : मावळातील तळेगाव दाभाडे येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरीचा हा संपूर्ण प्रकार मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दर्शनाच्या बहाण्याने आला अन्...
एक अज्ञात व्यक्ती दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात आली होती. सुरुवातीला या व्यक्तीने अत्यंत शांतपणे देवीचे दर्शन घेतले. हातात नारळ घेऊन देवीला कुंकूही वाहिलं; त्यामुळे मंदिरातील पुजाऱ्यालाही त्याच्यावर कोणताही संशय आला नाही. मात्र, काही क्षणातच आरोपीने संधी साधली. पुजाऱ्याचे लक्ष दुसरीकडे जाताच आरोपीने देवीचा सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट रुमालात लपवला आणि मंदिरातून पळ काढला.
दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच तळेगाव दाभाडे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मास्क आणि टोपी घालून आलेल्या या अज्ञात चोरट्याला शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
चोरी झालेल्या चांदीच्या मुकुटाचे वजन १ किलो आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याची अंदाजे किंमत २ लाखांच्या आसपास आहे. "भरदिवसा किंवा गर्दीच्या वेळी झालेल्या या चोरीमुळे मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे," दरम्यान, "या संशयित आरोपीबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने तळेगाव दाभाडे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.