
पुणे महापालिका ३० मिसिंग लिंक जोडणार.
६० किलोमीटर नवीन रस्ते उपलब्ध होणार.
१,००० कोटींचा प्रकल्प, राज्य सरकारकडून निधीची मागणी.
सक्तीने भूसंपादन प्रक्रिया सुरू.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून पुणे महापालिका ३० 'मिसिंग लिंक' जोडणार आहे. शहरातील १२ किलोमीटर मिसिंग लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर रस्ते उपलब्ध होणार आहेत. पुणे महनगर पालिकेकडून शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या रूंदीकरणाचे काम वेगाने केले जात आहे.
पुण्यात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर पालिकेने मिसिंग लिंक जोडण्याचा आरखडा तयार केला आहे. पण मिसिंग लिंकच्या भूसंपादनास योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता महापालिकेने सक्तीने भूसंपादन करण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील ३० मिसिंग लिंक जोडण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्य सरकारकडून या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
एकलव्य कॉलेज ते हायवे सुतारवाडी बस डेपो मिसिंग लिंक, चौधरी वस्ती ते फनटाईन रोड, हिंगणे चौक ते व्हीजन क्रिकेट अकॅडमी आणि माणिक बाग ते सन सिटी (कर्वेनगरकडे जाणारा रस्ता) या जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. पण पुण्यातील अनेक ठिकाणी नागरिकांनी मिसिंग लिंकसाठी भूसंपादन देण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे.
डॉ. आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज-(जावळकर उद्यान परिसरातील मिळकतींना नोटीस दिल्या आहेत)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रोजरी स्कूल अंडरपास (निरंजन प्रेस्टीजजवळ, तोडकर अपार्टमेंटजवळ व इंद्रनगरी सोसायटीजवळ)
शीला विहार ते भीमनगर, कोथरूड
मिलन सोसायटी ते कर्वे पुतळा
रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रे बीज (नदीपात्रातील रस्ता)
बाणेर ते पाषाण लिंक रोड
गणराज चौक ते कस्पटे वस्ती
नगरस रोड औंध ते बालेवाडी स्टेडियम
सुतारवाडी ते सुस वाकेश्वर चौक
सुस उड्डाणपूल सव्र्व्हिस रोड
पाषाण सर्कल ते सोमेश्वर चौक
व्हीआयटी कॉलेज ते कोंढवा रोड (तालाब कंपनी)
कोंढवा फॉरेस्ट ते एनआयबीएम रोड, दोरबजी मॉल
नगर रोड, विमानतळ, खराडी-
गुंजन चौक ते कल्याणीनगर (एचएसबीसी)
कल्याणीनगर ते खराडी (नदीकाठचा रस्ता)
५०९ चौक ते धानोरी रोड
विमानतळ रोड - पेट्रोल साठा ते शुभचौक
एबीसी चौक ते ताडीगुत्ता
किलर्लोस्कर पूल ते मगरपट्टा दक्षिण रोड
मुंढवा आरओबी ते केशवनगर (मंत्रा)
ऑमनोरा ते केशवनगर
बाणेर पॅनकार्ड क्लब ते ननवरे अंडरपास
रेल्वेलाइन ते लोहिया गार्डन, सोलापूर रोड
सिंहगड रोड -
हुमे पाइप ते प्रयेजा सिटी
सातारा रोड -
सीताराम आबाजी बिबवे पथ ते सातारा रोड
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.