Pune: चटका लावणारा अंत! ड्युटीवर असताना छातीत कळ; वाहतूक पोलिसाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Traffic Cop Dies of Heart Attack: पुण्यात ड्युटीवर असताना वाहतूक पोलीस धनाजी वणवे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. कात्रज मंडई चौकात अचानक कोसळल्यानंतर रुग्णालयात नेले असता मृत घोषित.
Pune traffic constable Dhanaji Vanve collapsed and died while on duty
Pune traffic constable Dhanaji Vanve collapsed and died while on dutySaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाहतूक विभागातील कर्मचारी यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं दुर्देवी मृत्यू झाला आहे. ड्युटी बजावत असताना अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

धनाजी भरत वणवे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे शहर वाहतूक विभागात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यातील कात्रज मंडई चौकात ड्युटीवर होते. सुमारे पावणे सातच्या दरम्यान, त्यांना चक्कर आली. त्यामुळे काही क्षणात ते खाली कोसळले. धनाजी खाली कोसळले असल्याचं पाहताच आजुबाजुच्या लोकांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली.

Pune traffic constable Dhanaji Vanve collapsed and died while on duty
Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्तव्य बजावत असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आक्स्मिक मृत्यूनंतर वणवे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

धनाजी वणवे यांच्याबाबत माहिती

धनाजी वणवे हे मुळचे पु्ण्यातील रहिवासी. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. ते पोलीस नाईक या पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत त्यांनी आपली ड्युटी चोखपणे बजावली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा शिवराज असा परिवार आहे.

Pune traffic constable Dhanaji Vanve collapsed and died while on duty
बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com