Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

Shocking Crime News: एका ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला. नंतर तिच्यासोबत अमानुष प्रकार घडला. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मक्याचे देठ घातलं. तसेच तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
Shocking Crime News
Shocking Crime NewsSaam Tv News
Published On

माणुसकीला काळिमा फासणारी घटना बिहारमधील मधेपुरा गावातून समोर येत आहे. एका ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला. नंतर तिच्यासोबत अमानुष प्रकार घडला. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड घातलं. तसेच तिची निर्घृण हत्या करण्यात आली. काही दिवसानंतर चिमुकलीचा रक्ताने माखलेला मृतदेह शेतात आढळला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गुनह्याची नोंद करत तपासाला सुरूवात केली आहे.

ही संतापजनक घटना आलमनगर पोलीस स्टेशन परिसरातील घडली आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (४ जुलै) रोजी मुलगी तिच्या आई, आजी आणि नातेवाईकांसह झोपली होती. मध्यरात्री ती अचानक गायब झाली. सकाळी तिचा मृतदेह सापडला. मेंढपाळाने शेतात चिमुकलीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याने गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांसह चिमुकलीच्या कुटुंबाने देखील शेतात धाव घेतली.

Shocking Crime News
Amdar Nivas: किळसावाणा! आमदार निवासातील 'सुग्रास' जेवणाचा आणखी व्हिडिओ; भाजीत सापडला सुतळीचा तुकडा

तेव्हा चिमुकलीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबाने तातडीने चिमुकलीला रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या गुप्तांगात मक्याचे देठ आणि लाकूड आढळलं आहे. नराधमाने बलात्कार करून चिमुकलीची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

कुटुंबाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. नराधमाने आधी चिमुकलचं अपहरण करून तिला शेतात नेलं असावं, नंतर तिच्यावर बलात्कार करून हत्या केली असावी, असा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी नराधमाला अटक करण्याची मागणी केली आहे.

Shocking Crime News
Divorce: '३ दिवस एकच अंडरवेअर घालतोस, आंघोळ करत नाहीस...मला काडीमोड हवाय' पत्नीचं डिव्हॉर्स लेटर व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com