Pune : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Traffic Diverted News : पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख देवी मंदिर परिसरात वाहतुकीत बदल होणार आहेत. तांबडी जोगेश्वरी, चतु:शृंगी, भवानी माता आणि महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्ते बंद व पर्यायी मार्गांची माहिती जाणून घ्या.
Pune Navratri Traffic Diversions Roads
Pune Navratri Traffic Diversions Roads AI Image
Published On: 
Summary
  • पुण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

  • अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक दरम्यानचा रस्ता बंद

  • तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या काही मार्गांवर बंदी

  • वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवासाचे नियोजन करावे

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख देवी मंदिरांच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचे नियोजन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील विविध भागांतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर आणि सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासापूर्वी वाहतुकीतील बदलांची माहिती घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा.

अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक रस्ता बंद

नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मात्र, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक या दिशेने एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.

Pune Navratri Traffic Diversions Roads
Evening Tea Time: संध्याकाळी चहा पिण्याची योग्य वेळ कोणती? दुपारच्या जेवणात आणि चहामध्ये किती असावे अंतर? जाणून घ्या

तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहतुकीत बदल

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ताही बंद राहणार आहे. या मार्गावरून केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात येणार असून, इतर वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

Pune Navratri Traffic Diversions Roads
Tea Tips : चहासोबत चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ! नाहीतर आजारांना मिळेल आमंत्रण

चतु:शृंगी मंदिर परिसरासाठी पर्यायी मार्ग

सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी वाढल्यास या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यानुसार वाहनचालकांना वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक आणि पुढे ओम सुपर मार्केटमार्गे जाण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Pune Navratri Traffic Diversions Roads
Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

भवानी माता मंदिर परिसरातही निर्बंध

भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरातही वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. नेहरू रस्त्याने श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी संबंधित वाहतूक निर्बंधांचे पालन करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com