Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांना सकाळ-संध्याकाळ चहा पिण्याची सवय असते. एक कप कडक चहा प्यायल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो आणि मूड फ्रेश राहण्यास मदत होते.
केवळ सकाळीच नाही तर अनेकजण दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळी आवर्जून चहा पितात. परंतू, आरोग्याच्या दृष्टीने चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे.
सायंकाळी चहा पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
दुपारचे जेवण झाल्यानंतर लगेचच चहा पिणे नेहमी टाळावे. जेवण आणि चहाच्या सेवनामध्ये किमान २ तासांचे अंतर असणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने अन्न पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे पुढे ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि गॅस यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच शरीराला अन्नातील पोषक घटक योग्य प्रकारे मिळत नाहीत.
सायंकाळी ७ किंवा ८ नंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे पूर्णपणे टाळावे.
रात्रीच्या वेळी चहा घेतल्यामुळे शरीरातील कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रात्रीच्या झोपेचे चक्र बिघडते आणि निद्रानाशाची समस्या येऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.