Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Pune Ganeshotsav Traffic Update : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी असून, कोणते रस्ते प्रभावित आहेत ते जाणून घ्या.
Pune Traffic News Update
Pune Traffic News Update AI
Published On
Summary
  • पुणे वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

  • १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान काही प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना २४ तास वाहतूक बंदी

  • गणेशोत्सवातील गर्दी, मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात गणेशभक्त, नागरिक तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी शहराच्या मध्यवर्ती भागात होत असते. त्याचबरोबर विविध गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठीही नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.

१२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतूक बंदी

येत्या १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना २४ तास वाहतूक बंदी राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत संबंधित वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सव काळात रस्त्यांवर होणारी मोठी गर्दी, मिरवणुका, गणेश मंडळांचे देखावे आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Traffic News Update
Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

जड वाहनांसाठी पोलिसांचे आवाहन

जड वाहनांमुळे गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी केलेल्या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. तसेच गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी नागरिकांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात विनाकारण वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षितपणे गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune Traffic News Update
Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

कोणत्या रस्त्यांवर जड वाहनांना बंदी?

  • शास्त्री रोड: सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक

  • टिळक रोड: जेधे चौक ते अलका चौक

  • कुमठेकर रोड: शनिपार ते अलका चौक

  • लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका चौक

  • केळकर रोड: फुटका बुरुज ते अलका चौक

  • बाजीराव रोड: पुरम चौक ते गाडगीळ पुतळा

  • शिवाजी रोड: गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

  • कर्वे रोड: नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक

  • फर्ग्युसन कॉलेज रोड: खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक

  • जंगली महाराज रोड: स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक

  • सिंहगड रोड: राजाराम ब्रिज ते सावरकर चौक

  • गणेश रोड/मुदलियार रोड: पॉवरहाऊस, दारुवाला पूल, जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com