Pune Traffic: संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

Pune Road Closures : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ११जुलै ते १५ जुलै दरम्यान प्रमुख मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. प्रशासनाने सांगितलेले पर्यायी मार्ग पाहा.
Pune Road Closures
Pune Trafficsaam tv
Published On
Summary

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल

पुण्यात प्रमुख मार्गांवरच्या वाहतुकीत बदल

प्रशासनाने सांगितले पर्यायी मार्ग

'आषाढी एकादशी' चा सण २५ जुलै २०२६ साजरा केला जाणार आहे. सर्वत्र वारीची चर्चा पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान होणार आहे. यामुळे ११ ते १५ जुलै या कालावधीत ग्रामीण भागात पालखी प्रस्थान सोहळा बंदोबस्त असणार आहे. वारीमुळे पालखी मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून पर्याय मार्ग खुले केले जाणार आहे. हे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी जारी केले आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)

12 जुलैला पहाटे २ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या गाड्या वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला या मार्गाने जातील. तसेच सोलापूरहून पुण्याकडे येणारी गाड्या चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड (मुक्काम वरवंड)

१३ जुलैला पहाटे २ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या हडपसरवरून मगरपट्टा मार्गे-लोणीकंद-केसनंद-वाघोली-राहू-पारगाव- न्हावरे-कष्टी-दोंड-कुरकुंभ मार्गे जातील. तर सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्या कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गाने जातील.

वरवंड ते उंडवडी - बारामती (उंडवडी मुक्काम)

१४ जुलैला पहाटे २ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाण्यासाठी नागरिकांनी चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ या मार्गाचा वापर करावा. तसेच या दरम्यान बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हा रोड बंद राहील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)

१५ जुलैला पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हा रोड बंद राहील. सदरची वाहतूक भिगवण मार्गे बारामतील जाईल. तसेच बारामतीकडून येणाऱ्या गाड्या भिगवन मार्गे सोलापूर –पुणे रोडला जातील.

Pune Road Closures
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळं सोनं ३७,००० रुपयांनी महागलं; चांदीचे दर काय? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

बारामती ते सणसर (सणसर मुक्काम)

१६ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता बंद असेल. तर वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टी वळविण्यात येईल. तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.

सणसर ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम)

१७ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते १८ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या गाड्या बारामती-कळंब-बावडा-इंदापूर व बारामती-भिगण्वण-इंदापूर या मार्गाने प्रवास करतील. तसेच इंदापूरहून बारामतीकडे जाणाऱ्या गाड्या इंदापूर –बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवन-बारामती या मार्गाने जातील. निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम)

१८ जुलैला पहाटे २ वाजल्यापासूनते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद असेल. त्यामुळे इंदापूकडून जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळंब-जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी –देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे होईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)

१९ जुलैला पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत आणि २२ जुलैला २ वाजल्यापासून ते दुपारी १२वाजेपर्यंत इंदापूर अकलुज रोडवरील वाहतूक बंद राहील.इंदापूर ते अकलुज या मार्गाने प्रवास करणारी लोक इंदापूर –हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलुज या मार्गाचा वापर करतील. तर अकलुज ते इंदापूरला जाण्यासाठी अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गाचा वापर करावा.

इंदापूर

१९ जुलै रोजी पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणाऱ्या गाड्या अकलुज-बावडा-नातेपुते-बारामती मार्गे जातील. अकलुजकडून बारामती आणि पुणे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. या दिवशी इंदापूरमधील पुणे-सोलापूर रोड बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक असा करावा.

Pune Road Closures
Pune Water Crisis: पुणेकरांसाठी चिंता वाढली! खडकवासला धरणाने तळ गाठला, गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com