Pune Water Crisis: पुणेकरांसाठी चिंता वाढली! खडकवासला धरणाने तळ गाठला, गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

Pune Dam Water Level Today: पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. धरणाने तळ गाठला आहे.
Pune Dam Water Level
Pune Dam Water LevelSaam Tv
Published On
  • खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट

  • धरणातील पाणीसाठा १५.४७ टक्क्यांवर आला आहे

  • गेल्या १० वर्षांतील हा सर्वात कमी जलसाठा आहे

  • पुण्यातील पाणी संकट आणखी गडद झाले

अक्षय बडवे, पुणे

पुणेकराची चिंता वाढवणारी बातमी आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. गेल्या १० वर्षातील खडकवासला धरणात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी देखील अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. परिणामी पुणे शहरावर पाणी संकट गडद होत चालले आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात पाणीसाठ्याचा निचांकी आकडा गाठला आहे. गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. यावर्षीच्या १ जुलै पर्यंत खडकवासला धरणात फक्त १५.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला खडकवासला धरणात ६३ टक्के पाणीसाठा होता. पुणेकरांना या महिन्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने शहरावर पाणी टंचाई सुरू आहे.

गेल्या १० वर्षातील खडकवासला धरणात पाणीसाठा (सन आणि टक्केवारी)

सन: २०१६

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): २१.३९ टक्के

सन: २०१७

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): १५.४७ टक्के

सन: २०१८

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): २९.६७ टक्के

सन: २०१९

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): २४.९९ टक्के

सन: २०२०

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): ६२.९२ टक्के

सन: २०२१

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): ४५.०७ टक्के

सन: २०२२

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): २१.३९ टक्के

सन: २०२३

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): ५०.६३ टक्के

सन: २०२४

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): ४२.३४ टक्के

सन: २०२५

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): ६३.६० टक्के

सन: २०२६

धरणातील पाणीसाठा (टक्केवारी): १५.४७ टक्के

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com