हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

पुण्यातील दारूकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला..विषारी दारू प्रकरणात 22 जणांचा बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासन कसं अॅक्शन मोडवर आलयं...पुणे आणि पिंपरीत गावठी दारूचा सुळसुळाट कसा आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Authorities demolish illegal liquor units in Pune after deadly hooch tragedy that claimed 22 lives.
Authorities demolish illegal liquor units in Pune after deadly hooch tragedy that claimed 22 lives.saam tv
Published On

पुणे शहर आणि आसपास पसरलेल्या

उपनगरातील झोपडपट्टी आणि कामगार वसाहतीच्या भागात अवैध दारूविक्रीचे धंदे पत्र्याच्या शेडमध्ये सर्रासपणे सुरू असतात.. अवैध दारूविक्रीवर बंदी असली तरीही पोलीस, राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यानं दारूची राजरोसपणे विक्री सुरु आहे. राज्य उत्पादन विभागाच्या कार्यालय परिसरातला हा व्हीडीओ बघा....

२२ जणांच्या बळीनंतर जाग आलेल्या पुणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू केलं आणि एकाच दिवसात तब्बल 55 ठिकाणी कारवाई करत 4 हजार 480 लीटर हातभट्टीची दारू जप्त केली.ही कारवाई झाली असली तरी पुणे आणि पिंपरीत अनेक ठिकाणी अवैध दारूविक्री खुलेआम सुरु आहे. या ठिकाणांची यादीच साम टीव्हीच्या हाती लागलीय.

कोथरूडमध्ये

लक्ष्मीनगर, सुतारदरा आणि किश्किंधानगरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीतून अवैध दारूव्रिकी सुरु

वारजे परिसरातील

रामनगर, गोसावी वस्ती, सहयोगनगर, गोकुळनगर आणि म्हाडा सोसायटी परिसर

वडगाव शेरीमधील साईनाथनगर, विमाननगरमध्ये यमुनानगर, खुळेवाडी, बर्माशेलमध्ये हातभट्टीच्या दारूची विक्री होते.

पुणेकर मळा, कानडेनगर परिसरात राजरोजपणे विक्री सुरू असून पोलिसांकडून दिखाव्यापुरती कारवाई होत असल्याचा आरोप आहे...

ही अवैध विक्री समोर आल्यानंतर प्रशासनाने 22 जणांवर निलंबनाची कारवाई केलीय. त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांवर कारवाई झालीय... विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडेवर आधीच गुन्हे दाखल असताना आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव प्रलंबित असतानाही तो मिथेनॉलसारखे घातक रसायन वापरून दारू कशी बनवत होता? हा खरा प्रश्न आहे...22 अधिकाऱ्याचं आता झालेलं निलंबन हेच दाखवून देतं की या अवैध हातभट्ट्यांना स्थानिक प्रशासकीय यंत्रणेचा वरदहस्त होता.... आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. त्यात हातभट्ट्यांच्या या काळ्या धंद्यांचे खरे मास्टरमाईंड जरी समोर आले तरी जे 22 जीव गेले त्याचं काय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com