Pune Terrorist Case Update: मोठी बातमी! ATS कडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त, कोंढव्यात दहशतवाद्यांना दिलं जात होतं प्रशिक्षण

Maharashtra ATS Big Action: कोंढव्यामध्ये दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर (Bomb Making Training) आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune Terrorist News Update
Pune Terrorist News UpdateSaam TV
Published On

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी प्रकरणात (Pune Terrorist Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसने मोठी कारवाई करत दहशतवादी कारवायांच्या मोठा कट उधळून लावला आहे.

अटक करण्यात आलेले दहशतवादी पुण्याच्या कोंढव्या भागामध्ये राहायचे. त्याच ठिकाणी दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर (Bomb Making Training) आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसच्या (ATS) तपासातून हे उघड झाले असून बॉम्ब तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Pune Terrorist News Update
Mumbai Breaking News: मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी स्फोटांची धमकी; पोलिसांना आलेल्या फोनने राज्यात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दहशतवादी प्रकरणात एटीएसला मोठे यश आले आहे. दहशतवाद्यांचं इसीस कनेक्शन उघड झालं आहे. कोंढव्यामध्ये दहशतवाद्यांसाठी बॉम्ब तयार करण्याचे वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. एटीएसने घटनास्थळी पुरलेले बॉम्बचे साहित्य जप्त केले आहे. थर्मामीटर, पीपेट, लँब इक्यूपमेंट जप्त करण्यात आले आहे. या बरोबरच बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी पांढरी पावडर सुद्धा एटीएसने जप्त केली आहे. ज्याठिकाणी या दोन्ही दहशतवाद्यांनी बॉम्बची चाचणी आणि प्रशिक्षण घेतलं होतं त्या ठिकाणावरुन ही पावडर जप्त करण्यात आली आहे.

Pune Terrorist News Update
Chhatrapati Sambhajinagar: १० रुपयांचा वाद... पाणीपुरीवाल्याकडून दारुड्या तरुणाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

तसंच, पुण्यात दहशतवाद्यांनी वापरलेली गाडी एटीएसने जप्त केली आहे. पुणे आणि इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली दुचाकी एटीएसकडून जप्त करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडे असलेली एक कार देखील एटीएसला सापडली आहे. या गाडीत २ बंदुक आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. घरी कोणाच्या हाती लागू नये म्हणून या दोघांनी बंदुक आणि काडतुसे गाडीत लपवून ठेवली होती.

Pune Terrorist News Update
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! भावी मंत्र्यांमध्ये आनंदी आनंद; कुणाची लागणार वर्णी?

१८ जुलै रोजी मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (२४ वर्षे) आणि मोहमम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३ वर्षे) यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. पुण्याच्या कोथरुड भागातून या दोघांना अटक करण्यात आली होती. हे दहशतवादी कोंढव्यातील मीठानगरमध्ये राहत होते. हे दोघेही पुण्यात बॉम्बस्फोट घडवणार होते.

या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची प्रशिक्षण आणि चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांविरोधात दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) कलमवाढ करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले हे दोन्ही दहतवादी एनआयएने जाहीर केलेल्या वॉन्टेड यादी मधले दहशतवादी आहेत. याप्रकरणात आतापर्यंत एटीएसने ५ जणांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com