Pune crime : विकृतीचा कळस! पुण्यात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, तरुणाचं काळं कांड व्हिडिओत कैद

Pune man arrested for stray dog abuse : पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक प्राणीप्रेमींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे
Pune Police arrest accused in shocking stray dog abuse case in Model Colony
Pune Police arrest accused in shocking stray dog abuse case in Model Colony
Published On

Pune Crime News : प्राण्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. येथील मॉडेल कॉलनीतील एका तरूणाचं काळं कांड कॅमेऱ्यात कैद झालेय. स्थानिक प्राणीप्रेमींनी त्या तरूणाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. तरूणाने एका भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. कुत्र्यासोबत तरुणाने केले अनैसर्गिक कृत्य केल्याचा व्हिडिओही चतुःश्रृंगी पोलिसांना दिला आहे. या घटनेनंतर पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Police arrest accused in shocking stray dog abuse case in Model Colony)

पुण्यातील वडारवाडी परिसरात विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली. पोलिसांनी श्यामराव धोत्रे या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. ५९ वर्षाच्या संजय शिंदे यांनी भटक्या कुत्र्यावर बलात्कार केल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिसात दाखल केली. संजय शिंदे हे भाग्येंद्र चुडासामा, साहिल करांडे आणि रॉजर जोसेफ या मित्रांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील भटक्या कुत्र्यांना चारा देतात. १० ऑक्टोबर रोजी महादेव मंदिर परिसरातील एक कुत्रा अचानक गायब झाल्याचं शिंदेंना समजलं. त्याबाबत चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका व्हिडिओच्या आधारे, त्या कुत्र्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

Pune Police arrest accused in shocking stray dog abuse case in Model Colony
Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यावर एका नराधमाने अत्याचार केले. ही धक्कादायक घटना २२ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत पहाटे चार ते पाच दरम्यान कुत्र्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी श्यामराव धोत्रे याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी हा वडारवाडीमधील राहणारा आहे. स्थानिकांनी दिलेला तो कथित प्रकाराचा व्हिडिओ खरा असल्याचं समजताच पोलिसांनी श्यामरावला बेड्या ठोकल्या.

Pune Police arrest accused in shocking stray dog abuse case in Model Colony
Samruddhi Expressway : समृद्धीवर पाहुण्यांच्या कारचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

शिंदे यांच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील यांनी तक्रार नोंदवून घेतली आणि कायदेशीर कारवाई केली. बीएनएस आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिक आणि प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Pune Police arrest accused in shocking stray dog abuse case in Model Colony
Nandurbar Accident : धनतेरसला भयानक अपघात, सातपुड्यात भाविकांवर काळाचा घाला, ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com