Nandurbar Accident : धनतेरसला भयानक अपघात, सातपुड्यात भाविकांवर काळाचा घाला, ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

6 devotees killed in pickup crash Maharashtra Nandurbar : धनतेरसच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा घाटात भीषण अपघात झाला. अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात होऊन सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. १५ पेक्षा जास्त जखमी असून मदतकार्य सुरू आहे.
Chandsaili Ghat Accident
Chandsaili Ghat Accident
Published On

Accident in Nandurbar Satpuda hills : राज्यात दीपोत्सवाला सुरुवात झाली, आज धनतेरस असल्याने अनेकजण मंदिरात दर्शनासाठी जात आहे. पण याच धनतेरसच्या दिवशी नंदूरबारमध्ये दुखाचा डोंगर कोसळला आहे. सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा (Chandsaili Ghat Accident) भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. (Wrecked pickup van after the tragic Dhanteras accident in Satpuda hills, Nandurbar; six devotees killed, over fifteen injured.)

सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपवर काळाने घाला घातला. चांदशैली घाटात पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्दैवी घटना झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. २२ ते २३ जणांच्या पिकअपचा भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये ६ भाविकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १५ पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जखमींची प्रकृती पाहता मृताची संख्या वाढू शकते, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

Chandsaili Ghat Accident
Samruddhi Expressway : समृद्धीवर पाहुण्यांच्या कारचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

अस्तंबा येथे दर्शन घेऊन येताना पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अपघातील मृत्यूच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांन घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय तळोदा पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून सर्व मदत केली जात आहे.

Chandsaili Ghat Accident
IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com