IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

IMD forecast heavy rain 48 hours Maharashtra Goa : IMDच्या अंदाजानुसार धनत्रयोदशीला पुढील ४८ तास दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर चक्रीवादळाची भीती.
 Weather Update: ४८ तास धोक्याचे!  , IMD कडून अलर्ट
IMD issues heavy rain and cyclone alert as Dhantrayodashi approaches; torrential showers expected across Maharashtra and South India.Saam TV
Published On

IMD Weather Forecast Latest News : धनत्रयोदशीला अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा (monsoon update) अंदाज वर्तवण्यात आलाय. हवमान विभागाच्या इशाऱ्यानुसार, तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे (cyclone warning) देशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तास महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासात (IMD weather ) अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. हे चक्रीवादळ २४ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या (Tamil Nadu cyclone,) उत्तर किनाऱ्यावर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर (Andhra Pradesh storm) धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ईशान्य मान्सूनचा प्रभाव दक्षिण भारतातील राज्यांवर जास्त दिसेल. त्यामुळे मुसळधार पाऊस (monsoon update) पडण्याची शक्यता आहे. पण उत्तर भारत, मध्य भारत आणि ईशान्य भागात हवामान स्वच्छ राहील.

 Weather Update: ४८ तास धोक्याचे!  , IMD कडून अलर्ट
Pakistan Airstrikes : पाकिस्तानचा पुन्हा एअरस्ट्राईक, खेळाडूंवर टाकले बॉम्ब, ८ अफगाण खेळाडूंचा मृत्यू

धनत्रयोदशी कसं असेल वातावरण ? (Dhantrayodashi)

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पुढील ४८ तासांत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये हिमवृष्टी आणि हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये तापमानात घट होईल. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे.

 Weather Update: ४८ तास धोक्याचे!  , IMD कडून अलर्ट
Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

मुंबईत पावसाचा इशारा - Mumbai rain alert,

मुंबईकरांना ऑक्टोबर हीटने तडाखा दिलाय. सध्या ३७ अंशापर्यंत तापमान आहे. पण पुढील ४८ तासात मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या सरी कोसळल्यास मुंबईकरांना ऑक्टोबर हीटपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत मुंबईतील हवामान थंड राहण्याची अपेक्षा आहे.

 Weather Update: ४८ तास धोक्याचे!  , IMD कडून अलर्ट
Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com