Pune : शिक्षण क्षेत्रात खळबळ! पुण्यातील नामंकित कॉलेजच्या प्राध्यापकाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Pune Sinhgad Dental College Professor Sucide : पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजचे विभागप्रमुख राजू पाटील यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Pune : शिक्षण क्षेत्रात खळबळ! पुण्यातील नामंकित कॉलेजच्या प्राध्यापकाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर
Pune Sinhgad Dental College Professor SucideSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या HOD राजू पाटील यांची आत्महत्या

  • घटना राहत्या घरी घडली घटना

  • सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा उल्लेख

  • पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू

अक्षय बडवे, पुणे

Pune Sinhgad Dental College Professor Raju Patil Sucide शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. राजू पाटील असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव असून त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटील हे पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली जेव्हा पाटील यांची पत्नी घरी आल्यानंतर त्यांना हा सगळा निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. कामाचा ताण वाढल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं पाटील यांनी त्यांच्या सुसाइड नोट मध्ये लिहिले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्याचे हे नेमकं एवढंच कारण आहे का? कि यापलीकडे अजून कुठली कारणं आहेत का? हे समजू शकलेले नाही.

Pune : शिक्षण क्षेत्रात खळबळ! पुण्यातील नामंकित कॉलेजच्या प्राध्यापकाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर
Pune : पुणेकरांसाठी गुड न्यूज! डबल डेकर पूल आजपासून सेवेत, वाहतूक कोंडी फुटणार; कुणाला होणार फायदा?

काही दिवसांपूर्वी, सिंहगड डेंटल कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली होती. शिक्षकांचे थकीत वेतन आणि शैक्षणिक नुकसानीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिंहगड दंत महाविद्यालयावर विद्यापीठाने मोठी कारवाई केली होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सिंहगड दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची संलग्नता रद्द केली होती.

Pune : शिक्षण क्षेत्रात खळबळ! पुण्यातील नामंकित कॉलेजच्या प्राध्यापकाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर
Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

विद्यापीठ अधिनियम मधील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका महाविद्यालयावर ठेवण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक दर्जानुसार महाविद्यालयाचे कामकाज नसल्याचे निदर्शनास आल्याने दंतविद्याशाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असंलग्नित करण्यात आला होता.अशातच विभागप्रमुख यांनी सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा उल्लेख केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com